रोज ७५ रुपये गुंतवून २० वर्षात मिळवा ३३ लाख रुपये

 भारतीय शेअर बाजारात १० वर्षापेक्षा जास्त काळाच्या गुंतवणुकीवर इतर कोणत्याही  मालमत्ता गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त रिटर्न्स मिळत आहेत.

Updated: Nov 10, 2018, 09:31 PM IST
रोज ७५ रुपये गुंतवून २० वर्षात मिळवा ३३ लाख रुपये title=

मुंबई:  भारतीय शेअर बाजारात १० वर्षापेक्षा जास्त काळाच्या गुंतवणुकीवर इतर कोणत्याही  मालमत्ता गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त रिटर्न्स मिळत आहेत. म्हणजेच जे शेअर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत त्यांना चांगले रिटर्न्स मिळत आहेत.

जर तुम्हाला शेअर बाजारच्या गुंतवणुकीसंदर्भात जास्त माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

‘न्यूज 18’ ने इन्हेस्टमेंटसदर्भातील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही रोज ७५ रुपये भरुन २० वर्षानंतर त्याचे ३३ लाख रिटर्न्स मिळवू शकता.

इक्विटी म्यूच्यूअल फंड्समधून सोपा होईल मार्ग

एवढी रक्कम मिळविण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड्स तुम्हाला गुंतवणुकीची चांगली संधी देतात. समजा तुमचे वय साधारण २४ वर्षे असेल आणि महिन्याचा पगार २० हजार असेल तर ७५ रुपयांची गुंतवणुक करणे तुम्हाला जास्त कठीण जाणार नाही. तुम्ही एका चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडची निवड करा.

चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडमधून वर्षाला १५ टक्के रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही प्रत्येक दिवशी ७५ रुपये असा हिशोब जोडलात तर महिन्याची ही रक्कम २,२५० रुपये होईल. पुढच्या २० वर्षात तुम्ही साधारण ५.४० लाखाचीच गुंतवणुक केलेली असेल.

कंम्पाऊंडिंग इंट्रेस्टची कमाल

जर तुम्ही १५ टक्के रिटर्न्सप्रमाणे मिळणारी रक्कम एकत्र केली तर साधारण ९ लाख रुपये होईल. आपण गुंतवणुक केलेली रक्कम १५ टक्के किंमतीने कंम्पाऊंडिंग होत असते. त्यामुळे कंम्पाऊंडिंग पावरने तुम्हाला २० वर्षानंतर ९ लाख नाही तर ३३,६८,७८९ रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही वेळ न घालविता अशा प्रकारची गुंतवणुक करणे गरजेचे आहे.

कारण तुमच्या कंम्पाऊंडिंगसाठी तुम्हाला जास्त वेळ मिळू शकेल. शेअर बाजार, म्युच्युअल फंडमधील कोणतीही गुंतवणुक करताना त्यातील कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे. यासाठी तज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता.