नवऱ्याने बायकोचाच नंबर व्हायरल करत..., इतकं विकृत काम त्यानं का केलं?

नवऱ्याने त्याच्याच पतीचा मोबाईल नंबर केला व्हायरल..

Updated: Sep 8, 2022, 03:28 PM IST
नवऱ्याने बायकोचाच नंबर व्हायरल करत..., इतकं विकृत काम त्यानं का केलं? title=

Crime News : नवऱ्याने आपल्याच बायकोचा नंबर देत अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवायला लावले असल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र पतीच्या असं करण्याचं पत्नीने जे कारण सांगितलं ते वाचून तुम्हीही वाल हैराण.

नेमकं काय आहे प्रकरण?  
पती आकाशचं  2009 साली लग्न झालं होतं. लग्नावेळी फसवणूक करत खोटी माहिती देऊन लग्न केलं होतं. असा आरोप पत्नीने केला आहे. आकाश काही कामधंदा करत नव्हता त्यामुळे 2 वर्षांनी दोघांमध्ये वाद होऊ लागले. लग्नावेळी आकाशच्या पत्नीच्या घरच्यांनी लग्न धूमधडाक्यात केलं होतं. त्यावेळी त्यांनी 15 लाख रूपये खर्च केला होता. 

2021 साली भांडणादरम्यान आकाशने मारहाण केल्याचा पतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यावेळी आकाशने पत्नीला घरातून बाहेर काढलं होतंं, घरच्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही उपयोग झाला नाही. शेवटी आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडा कायद्यांतर्गत पत्नी गुन्हा दाखल करते.

आकाशने त्यानंतर पत्नीची बदनामी करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने पत्नीचा फोन नंबर त्याच्याच जवळपास 30 मित्रांना दिला. त्यानंतर त्याच्या पत्नीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ येऊ लागले. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जात तक्रार केली मात्र पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर आकाशची पत्नी आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर महिला कक्षाच्या एसीपींना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील  कानपूर इथली आहे.