200 रुपयांपेक्षाही स्वस्त शेअर! दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनेही लावला पैसा; 58 टक्क्यांपर्यंत परताव्याची क्षमता

आयसीआयसीआय सेक्युरिटीजने या दोन्ही शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Updated: Sep 30, 2021, 09:37 PM IST
200 रुपयांपेक्षाही स्वस्त शेअर! दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनेही लावला पैसा; 58 टक्क्यांपर्यंत परताव्याची क्षमता title=

मुंबई : शेअर बाजाराचा गेल्या 1 वर्षातील परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. बाजाराच्या तेजीमध्ये अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये अनेक शेअर असे आहेत की, ते अजुनही दमदार तेजीचे प्रदर्शन करू शकतात. असेच दोन शेअर आहेत. GAIL INDIA आणि ONGC हे होत. गेल इंडियाने गेल्या वर्षभरात 79.52 टक्के रिटर्न दिला आहे. ONGCने 108.46 टक्के रिटर्न दिला आहे. ब्रोकरेज हाऊसेसच्या मते अजूनही शेअर्समध्ये तेजीची शक्यता आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटीजने या दोन्ही शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

आयसीआयसीआय सेक्युरिटीजने गेल इंडियामध्ये 218 रुपयांचे लक्ष दिले आहे. तसेच ONGC च्या शेअर्सची खरेदी करून त्यासाठी 229 रुपयांचे लक्ष दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने दोन्ही कंपन्यांचा बिझनेस आऊटलुकमध्ये ग्रोथचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेलच्या शेअर्सचा सध्याचा भाव 158.70 रुपये आहे. या लेवलवर शेअर खरेदी केल्यानंतर शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी 218 रुपयांचे लक्ष ठेवल्यास, गुंतवणूकदारांना 37.37 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.