UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अ‍ॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2023, 01:36 PM IST
UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल? title=
UPI Payment Digital Payments

UPI Transaction Limit in Marathi: बँकिंग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. तसेच ऑनलाईन पैसे पाठविणेही सोपे झाले आहे. तुम्ही चहा किंवा भाजीचे पेमेंटही UPIच्या माध्यमातून करत असता. आता UPI पेमेंट करत असाल तर ही महत्त्वाची बातमी. तुम्ही एका दिवसा किती पैसे ट्रान्सफर करु शकता, हे जाणून घ्या.

UPI पेमेंट करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा?

सध्या अनेक लोक UPIचा वापर करत आहेत. एका दिवसात अनेक वेळा अनेक व्यवहार होतात. पाहिले तर डिजिटलायझेशन सध्या खूप व्यापक झालेय. डिजिटल पेमेंट बहुतेक GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अ‍ॅप्सद्वारे केले जात आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवू शकता. वास्तविक, ही मर्यादा एनपीसीआयनेच निश्चित केली आहे.

तुम्ही UPI ने एका दिवसात इतके पेमेंट करु शकता

NPCI ने UPI पेमेंटसाठी मर्यादा निश्चित केली आहे.  NPCI म्हणते की प्रत्येक वापरकर्ता UPI द्वारे एका दिवसात फक्त 1 लाख रुपये पाठवू शकता. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. जे लोक दररोज 100 किंवा 200 रुपये पेमेंट करतात, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु जे एका दिवसात जास्त व्यवहार करतात आणि तेही UPI द्वारे, त्यांच्यासाठी खूप त्रास होऊ शकतो. आता प्रत्येक अ‍ॅपद्वारे एका दिवसात किती रकमेचा व्यवहार केला जाऊ शकतो ते जाणून घ्या.

GPay: तुम्ही GPay वापरत असाल तर एका दिवसात तुम्ही UPI द्वारे फक्त 1 लाख रुपये पाठवू शकाल. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. तुम्ही एका दिवसात कितीही रक्कम द्याल, जरी ती वेगळी असली तरी ती एकूण एक लाख रुपयांपर्यंत असावी.

paytm : NPCI नुसार, पेटीएमद्वारे तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकाल. पेटीएमवर एका तासात 20,000 रुपयांपर्यंत व्यवहार करु शकता. दर तासाला किमान 5 व्यवहार आणि कमाल 20 व्यवहारांना परवानगी आहे.

PhonePe: फोन पे यूजर्स एका दिवसात 1 लाखांपर्यंतचे व्यवहार करु शकतात. ती व्यक्ती ज्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत आहे त्यावरही अवलंबून असते.

Amazon Pay: Amazon पेवरुन एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांना परवानगी आहे. पण Amazon Pay वर नोंदणी करण्याच्या पहिल्या 24 तासांसाठी कमाल मर्यादा 5,000 रुपये ठेवण्यात आहे.