Weather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ

Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. 

Updated: Dec 7, 2022, 12:40 PM IST
Weather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ  title=
IMD rain predictions in nagpur cyclone in tamilnadu read details latest Marathi news

Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. नागपूरच्या (nagpur) प्रादेशिक हवामान विभागानं यासंबंधीची माहिती दिली. तिथे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi mahamarg) नागपूर ते शिर्डी (Nagpur to shirdi) या 520 किमी अंतराच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन 11 तारखेला होणार आहे. यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी (PM Modi) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याच दिवशी मेट्रोच्या रिच 2 आणि 4 चा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. पण, आता मात्र या दोन्ही बहुप्रतिक्षित कार्यक्रमांवर पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. 

किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ? (mandous cyclone)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळामध्ये झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. हे वादळ किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा देत 8 डिसेंबरला या वादळाचा फटका तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशला बसणार असल्याची माहिती IMD नं दिली. ‘मंदौस’ असं या चक्रिवादळाचं नाव. (IMD rain predictions in nagpur cyclone in tamilnadu read details latest Marathi news )

हेसुद्धा वाचा : Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?

सदर वादळाच्या पार्श्वभूमीवर विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, कांचीपुरम, तिरुवल्लूर, अरियालुर, पेराम्बलुर, चेन्नई, कल्लाकुरिची, माइलादुथुराई, तंजावुर, तिरुवरुर आणि नागापट्टिनम या जिल्ह्यांमध्ये Red Alert देण्यात आला आहे. या भागांमध्ये काळजी घेण्याची जास्त गरज असल्याचं दिसत आहे, कारण 2016 नंतर इथं पूरसदृश्य परिस्थिती उदभवू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

... म्हणून ऐन थंडीच्या मोसमात देशातील काही भागांना पाऊस झोडपणार 

वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागर आणि नजीकच्या संपूर्ण परिसरात गेल्या काही काळापासून वातावरण सातत्यानं बदलत आहेच. ज्यामुळं डिसेंबर महिन्यामध्येही देशाच्या काही भागांमध्ये वरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. फक्त दक्षिण किनारपट्टीच नव्हे, तर तिथे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातही सोसाट्याचा वारा सुटेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.