इम्रान खान चारित्र्यवान व्यक्ती; शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार- नवज्योतसिंग सिद्धू

सेतू बांधून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. 

Updated: Aug 2, 2018, 11:17 AM IST
इम्रान खान चारित्र्यवान व्यक्ती; शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार- नवज्योतसिंग सिद्धू  title=

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू व काँग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू हे इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार आहेत. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने सिद्धू यांना निमंत्रण पाठवले होते. येत्या ११ तारखेला हा शपथविधी सोहळा पार पडेल. सिद्धू यांच्याशिवाय बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि माजी क्रिकेटपटू कपिल देव व सुनील गावस्कर यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सिद्धू वगळता अजून कोणीही हे निमंत्रण स्वीकारलेले नाही. 

इम्रान खान हे चारित्र्यवान व्यक्ती आहेत. सेतू बांधून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या शपथविधीचे निमंत्रण मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मी हे निमंत्रण स्वीकारत आहे.

बुद्धिवंतांची प्रशंसा होते, सामर्थ्यवान लोकांचा धाक असतो, मात्र, चारित्र्यवान लोक हे विश्वासार्ह असतात.

इम्रान खान हे नक्कीच चारित्र्यवान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. ते सगळे अडथळे दूर करुन लोकांना एकत्र आणण्याचे काम करतील, असा विश्वास सिद्धू यांनी व्यक्त केला.