भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी

आता बातमी चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धडकी भरवणारी.  (Indian Army gets ready for 'swarm' drone attacks )

Updated: Jan 16, 2021, 08:59 PM IST
भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : आता बातमी चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धडकी भरवणारी. अत्यंत घातक अशी दूरवरून मारा करणारी स्वार्म ड्रोन (swarm drone attacks)आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात आली आहे. त्यामुळे जीवितनाहीचा धोका टाळून शत्रूवर अचूक आणि प्रभावी मारा करणं शक्य होणार आहे. (Indian Army gets ready for 'swarm' drone attacks )

अतिरेक्यांनो... पाकिस्तान्यांनो... चिन्यांनो.. आता आमच्या वाटेला गेलात तर स्वार्म ड्रोनचा (Swarm drone) हा मोठा थवा तुमचा वेध घेतल्याशिवाय राहणार नाही. 'स्वार्म ड्रोन'. युद्धशास्त्रातलं सर्वात आधुनिक आयुध. भारतीय सैन्याच्या ताफ्यामध्ये आता हे घातक स्वार्म ड्रोन सहभागी झालेत. हा नवा भारत आणि नव्या भारताची अत्याधुनिक सेना आहे. स्वार्म या शब्दाचा अर्थ आहे झुंड. एकाच वेळी अनेक ड्रोन उड्डाण घेतात आणि लक्ष्यावर अचुक मारा करतात.

भारतीय लष्कराच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 75 स्वार्म ड्रोन्सनी उड्डाण भरले आहे. हे दृष्य बघून चीनच्या पायाखालची जमीन सरकली असेल. भारत या तंत्रामध्ये अद्याप खूप मागे आहे, असा ड्रॅगनचा समज असावा. स्वार्म ड्रोनमुळे चीनचं हे दीवास्वप्न मोडले आहे.

स्वार्म ड्रोन हे एक खतरनाक आयुध आहे. याची अनेक कारणं आहेत. एकतर कित्येक किलोमीटर दूरवरून या ड्रोनचं नियंत्रण करता येत असल्यामुळे हल्ल्यावेळी जीवितनाही होण्याचा धोका नसतो. दुसरे कारण असं की हे ड्रोन नियोजित लक्ष्यावर अत्यंत अचुक मारा करू शकतात.

ड्रोन एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी हल्ला करतात. एकाच वेळी कित्येक ड्रोन हल्ला करत असल्यामुळे तो परतवून लावणे अत्यंत अवघड होतं. 

आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वार्म ड्रोनचा हल्ला परतवून लावण्याचं तंत्रज्ञान अद्याप कोणत्याच देशाकडे नाही. 

स्वार्म ड्रोन हे भविष्यातलं हत्यार आहे. आगामी काळात सैनिकांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी यंत्रांमध्येच लढाई होणार आहे आणि त्यामध्ये स्वार्म ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. केवळ चीन किंवा पाकिस्तानसारखे कुरापतखोर शेजारीच नव्हे, तर जंगलात किंवा डोंगरदऱ्यांमध्ये लपून बसलेले अतिरेकी, नक्षलवादी यांच्यावरील कारवाईतही स्वार्म ड्रोन अत्यंत उपयोगी आहेत.