पीओकेत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? भारतीय लष्कर POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार

फक्त आदेशाची वाट पहातोय, नॉदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल Upendra Dwivedi यांचं मोठं विधान

Updated: Nov 22, 2022, 09:01 PM IST
पीओकेत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? भारतीय लष्कर POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार title=

Surgical Strike in POK : भारतीय लष्करानं (India Army) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करण्याची तयारी केलीय. नॉर्दन कमांडचे लेफ्टनंट जनरल यांनी तसे संकेत दिले आहेत. यापूर्वी दोनवेळा भारतानं थेट पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केलाय. पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे लष्करी तळ (Militant Military Base) भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करत शेकडो दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला. 

सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय
या दोन्ही कारवाया पाकव्याप्त काश्मिरात (Occupied Kashmir) करण्यात आल्या होत्या. आता परत एकदा भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मिरबद्दल मोठं विधान केलंय. फक्त सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय, भारतीय लष्कर पीओके ऑपरेशनसाठी सज्ज असल्याचं नॉदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे.

काश्मिरात आधीच भारतानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय. ड्रोनच्या (Drone) माध्यमातून अतिरेक्यांवर नजर ठेवली जातेय आणि रोज एकातरी दहशतवाद्याचा खात्मा केला जातोय. त्यात भारतीय लष्करानं पुन्हा एकदा पीओकेत ऑपरेशन करण्याची तयारी दर्शवलीय. त्यामुळे आधीच राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या पाकिस्तानची भंबेरी उडणार. 

कोणत्याही कारवाईसाठी सज्ज
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तनाला इशारा दिला आहे. सीजफायरचं (Ceasefire) उल्लंघन झाल्यास पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल, सीमेवर शांतता ठेवण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे, पण पाकिस्तानने कुरापती केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पहातोय, आम्ही कारवाईला सज्ज असल्याचंही उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलंय. 

टार्गेट किलिंग रोखणार
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जम्मू-काश्मिरमधल्या टार्गेट किलिंगवरही (Target Killling) प्रतिक्रिया दिली आहे. खोऱ्यात अतिरेकी कारवायांवर मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत असल्याने दहशतवादी बिथरले आहेत. त्यामुळेच निशस्त्र नागरिकांना टार्गेट करुन त्यांना मारलं जात आहे. पण त्यांचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असं उपेंद्र द्विवेदी यांनी ठणकावलं आहे. खोऱ्यातील तरुणांना भडकवलं जात आहे, पण त्यांना या मार्गावर जाण्यापासून रोखण्याची गरज असल्याचं उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं.