Indian Railway देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

Indian Railway News : बर्फाळ प्रदेशातून रेल्वे सफर करायचीये? स्वित्झर्लंड कशाला, कमी खर्चात देशातील 'या' ठिकाणी पोहोचा. पाहा सविस्तर माहिती. 

सायली पाटील | Updated: Jan 1, 2024, 10:00 AM IST
Indian Railway देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल  title=
Indian Railways Winter Wonderland ride watch journey through snow covered Kashmir

Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर. 

सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू काश्मीरच्या बर्फाच्छादित डोंगररांगा आणि मैदानी क्षेत्रांमधून रेल्वे वाट काढताना दिसत आहे. काश्मीरच्या खोऱ्यात बर्फवृष्टी झाल्यानंतर नेमकं काय चित्र असतं हे या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परदेशात जाऊन बर्फातून वाट काढणाऱ्या एखाद्या प्रवासाची तयारी तुम्हीही करत असाल तर, आता Indian Railway च्या या सेवेचा तुम्हीही लाभ घेऊ शकता. 

हेसुद्धा वाचा : New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

कुठून जातो हा रेल्वेमार्ग? 

काश्मीरमधील बनिहाल-बारामुल्ला या मार्गावर हा अविस्मरणीय रेल्वे प्रवास करता येतो. काश्मीरचं स्थानिक जीवन आणि येथील संस्कृती जवळून पाहण्याची संधी या रेल्वे प्रवासामुळं मिळते. हा 119 किमी ब्रॉड गेज रेल्वे मार्ग जम्मू-बारामुल्ला रेल्वे मार्गाचाच एक भाग आहे. या मार्गामुळं श्रीनजर थेट दिल्ली रेल्वेशी जोड़लं गेलं आहे. 

या रेल्वे मार्गानं प्रवास करण्यासाठी श्रीनगरहून दल गेटपासून 11 किमी अंतरावर तुम्ही बनिहालपर्यंत पोहोचू शकता. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे ठिकाण 8 किमी अंतरावर आहे. काय मग, एक अफलातून अनुभव देणाऱ्या या रेल्वेनं तुम्ही कधी प्रवास करताय?