भारतीय जवानांच्या आवाजातल गाण तुमच्या ह्रदयाला भिडेल

भारतीय सैनिकांबद्दल प्रत्येकाच्या मनात भरभरून आदर असतो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित बातमी, एखादा व्हिडिओ, गाणं आपण मन लावून ऐकतो.

Updated: Apr 28, 2018, 06:15 PM IST
भारतीय जवानांच्या आवाजातल गाण तुमच्या ह्रदयाला भिडेल  title=

नवी दिल्ली : भारतीय सैनिकांबद्दल प्रत्येकाच्या मनात भरभरून आदर असतो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित बातमी, एखादा व्हिडिओ, गाणं आपण मन लावून ऐकतो. सीमेवरच त्यांच आयुष्य कितीही खडतर असल तरी देशातल्या नागरिकांसमोर आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारच स्मितहास्य असतच. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चर्चेचा विषय बनलाय.

१ कोटी २० लाख जणांनी पाहिलाय हा व्हिडिओ 

दिल्लीच्या इंडिया गेटवर काही जवानांनी 'बॉर्डर' सिनेमातील 'संदेसे आते है' गाणं गायल. या जवानांचा आवाज कोणत्या प्लेबॅक सिंगरपेक्षा कमी नाहीए.  हे गाणं गायल्यानंतर उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहतो. 'सीमा सुरक्षा बल'ने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेयर केलाय. जो आतापर्यंत १ कोटी २० लाख जणांनी पाहिलाय.

१३ जून १९९७ ला रिलीज 

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने उत्तर भारतातील हवाई तळांवर हल्ला केला. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर हल्ला चढवला. यामध्ये सैनिकांच देशावरच प्रेम आणि खाजगी आयुष्य यातून पाहायला मिळत. या सत्यघटनेवर आधारित सिनेमा १३ जून १९९७ ला रिलीज झाला होता.

'संदेसे आते है'

'संदेसे आते है' हे गाण्याचे शब्द जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. यासाठी त्यांना नॅशनल अॅवार्डदेखील देण्यात आला. असा सिनेमा बनविणारे जेपी दत्ता सध्या 'पलटन' नावाचा नवा सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा १९६२ मधल्या भारत-चीन युद्धावर आधारित असणार आहे.