इन्फोसिसच्या नव्या CEO चा पगार बघून तुम्हाला बसेल धक्का...

देशाची प्रमूख प्रौद्योगिक कंपनी म्हणजे इन्फोसिस. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 4, 2018, 06:50 PM IST
इन्फोसिसच्या नव्या CEO चा पगार बघून तुम्हाला बसेल धक्का...  title=

मुंबई : देशाची प्रमूख प्रौद्योगिक कंपनी म्हणजे इन्फोसिस. 

या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ पदावर सलिल पारेख यांच वेतन ठरला आहे. त्यांच्या कामाची वर्षे ही 5 वर्ष असणार आहेत. सलिल पारेख यांना मिळणारा पगार वाचून तुम्हाला धक्काच बसेल. भरपूर पगाराची नोकरी मिळावी हे स्वप्न साऱ्यांचच असतं. 

सलिल पारेख यांना 6.5 करोड रुपये वर्षाला वेतन देण्यात आले आहे. वर्ष 2018-19 वर्षाच्या अखेरीस 9.75 करोड रुपयाचे वेरिएबल वेतन घेण्याचा हक्क त्यांना मिळाला आहे. यानुसार त्यांना एकूण 16.25 करोड रुपये मिळणार आहे. यासंदर्भात इन्फोसिसच्या स्वतंत्र बोर्डाचे मेंबर किरण मजूमदार शॉ यांनी ही माहिती दिली. 

शॉ यांनी सांगितले की पारेख यांचा फिक्स पगार हा 6.5 करोड रुपये आहे. वित्त वर्ष 2018-19 च्या अखेरिस 9.75 करोड वेतन आहे. माजी सीईओ विशाल सिक्का यांचे 2016 -17 या वर्षातील पगार हा 67.5 लाख डॉलर म्हणजे 42.80 करोड रुपये वेतन होते. कंपनीचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी या पगारावर नाराजगी व्यक्त केली. 

प्रतिद्वंदी कंपनी विप्रोचे सीईओ अब्दाली नीमचवाला यांना 20 लाख डॉलर म्हणजे 12.7 करोड रुपये पगार मिळतो. याबाबत किरण यांनी सांगितले की, पारेख यांना 3.25 करोड रुपयांचे प्रतिबंधयुक्त शेअर्स देखील दिले जाणार आहेत. तसेच कार्यप्रदर्शनाच्या आधारावर त्यांना 13 करोड रुपये शेअर अनुदान दिले जाणार आहे. तसेच 9.75 करोड रुपयाचे शेअर देखील दिले जाणार आहेत. 

सलिल पारेख यांचा कार्यकाल 5 वर्ष 

पारेख यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असणार आहे. पारेख यांचा स्टॉक कंपंजेशन कार्यकाल हा वेगवेगळा असणार आहे. शॉ यांनी हे देखील सांगितले की, पारेख यांच्या कॉन्ट्रक्टमध्ये या सगळ्याचा उल्लेख केला आहे. आणि त्यांना हा एवढा पगार बाहेर कुठेच मिळणार नाही.