भाजपचे मुख्यमंत्री म्हणे, महाभारत काळापासूनच इंटरनेट !

महाभारत काळापासूनच इंटरनेट होते, असा जावाई शोध भाजपने नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलाय. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 18, 2018, 10:18 AM IST
 भाजपचे मुख्यमंत्री म्हणे, महाभारत काळापासूनच इंटरनेट ! title=

आगरताळा : महाभारत काळापासूनच इंटरनेट होते, असा जावाई शोध भाजपने नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलाय. महाभारत काळापासून इंटरनेट होते, असे ते म्हणालेत. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या, असे सांगून अक्कलेचे तारे तोडलेत.आगरताळा या ठिकाणी एका कार्यक्रमात देब यांनी हा दावा केलाय. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. संजय हे डोळ्यांनी युद्ध पाहू शकले, कारण त्याला इंटरनेट कारणीभूत आहे असे देब यांनी म्हटले. इंटरनेट आणि सॅटेलाइट महाभारत काळापासून होते हेच संजय यांच्या दिव्यदृष्टीमागचे प्रमुख कारण होते, असा अजब दावाही त्यांनी केलाय.

सध्या इंटरनेटचे युग आहे. या नव्या टक्नोसॅव्हीत भारत पुढे आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. इंटरनेटची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. युरोप तसेच अमेरिका तांत्रिक प्रगतीचे दावे करतात. मात्र, तांत्रिक क्षेत्राचा जनक हा भारत देश आहे.

भाजपने त्रिपुरा येथे शून्यातून सत्ता स्थापन केली. या मुख्यमंत्री बिप्लब देब याचा मोलाचा वाटाआहे. डाव्या आघाडीची येथील अनेक वर्षांची स्थता उखडून टाकली. त्रिपुरात भाजपचे कमळ पुलवले. दरम्यान,आता त्यांनी देशाबद्दल अभिमान व्यक्त केलाय आणि महाभारत काळापासून इंटरनेट आणि सॅटेलाइट होते, असा सुपिक डोक्यातून त्यांनी लावला.