आता समजलं का? एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला पुरुषांच्या शेजारी रेल्वे सीट देत नाही

आयआरसीटीसीची वेबसाईट ही भारतातील सर्वात बिजी वेबसाईटपैकी एक आहे. 

Updated: Jul 14, 2021, 08:54 PM IST
आता समजलं का? एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला पुरुषांच्या शेजारी रेल्वे सीट देत नाही title=

मुंबई : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगपासून ते प्रवासात बसल्या जागी खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देते. पण याशिवाय अनेक सेवा-सुविधा आयआरसीटीसीकडून दिल्या जातात, ज्याबाबत आपल्याला माहिती नसते. अनेकदा महिलांना विविध कारणांमुळे एकट्याने प्रवास करावा लागतो. एकट्याने प्रवास करताना त्या प्रवाशी महिलेला कोणताही त्रास होऊ नये, याची पूर्ण काळजी आयआरसीटीसूकडून घेतली जाते. (IRCTC does not give seat among men to the lone woman traveling in the train)

महिलांसाठी विशेष काळजी 

आयआरसीटीसी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेते. railrestro.com नुसार, एखादी महिला रेल्वे तिकीट बूक करत असेल तर आयआरसीटीसी त्या महिलेला दुसऱ्या महिलेच्या शेजारचीच जागा देते.  प्रवासादरम्यान पेचात्मक परिस्थितीत अनेकदा महिलांना पुरुषांमध्ये बसून प्रवास करावा लागतो. यामुळे महिलांना अस्वस्थता जाणवते. ही अस्वस्थता जाणवू नये, यासाठी आयआरसीटीसी पूर्ण काळजी घेते. 

सर्वात बिजी वेबसाईट 

आयआरसीटीसीची वेबसाईट ही भारतातील सर्वात बिजी वेबसाईटपैकी एक आहे. आयआरसीटीसीच्या E ticketing च्या मदतीने  मिनिटात तब्बल 7 हजार 200 तिकीट आरक्षित करता येतात. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन पहिल्या दिवशी केवळ 27 तिकीट बूक करण्यात आल्या होत्या. आता दररोज 5 लाखांपेक्षा अधिक तिकीट बूक केल्या जाता.  

तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाईटशिवाय  (IRCTC) ऑनलाईन तिकीट काढता येत नाही. या आयआरसीटीसीच्या वेबसाईटची देखरेखची जबाबदारी पूर्णपणे CRIS म्हणजेच ( Centre for Railway Information Systems) वर असते.