इवांकासाठी भारतात आल्यात स्पेशल गाड्या, कशी आहे सुरक्षा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका भारतात येत आहे. २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ती हैदराबाद येथे होत असलेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योर परिषदेत ती सहभागी होणार आहे.

Updated: Nov 27, 2017, 06:11 PM IST
इवांकासाठी भारतात आल्यात स्पेशल गाड्या, कशी आहे सुरक्षा? title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका भारतात येत आहे. २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ती हैदराबाद येथे होत असलेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योर परिषदेत ती सहभागी होणार आहे. हैदराबाद पोलिसांनी इवांकासहीत १५० देशातील प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी १० हजार जवान तैनात केले आहेत. 

अमेरिकी जवनांची सुरक्षा

द हिंदूच्या रिपोर्टनुसार, इवांकाची सुरक्षा तीन लेव्हलची असेल. सर्वात आतल्या बाजून यूनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस(USSS)चे जवान तैनात असतील. तर इतर दोन लेव्हलमध्ये हैदराबाद पोलीस यांची सुरक्षा असेल. 

निवडक लोकांची भेट

सर्वात महत्वाची बाब म्हणजे इवांकाला कुणीही भेटू शकणार नाहीये. तिला भेटणा-यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यादीत जे नाव असेल त्यांच्याशिवाय कुणालाही तिथे एन्ट्री मिळणार नाहीये. 

कुठे थांबणार?

सध्या इवांका हैदराबादच्या कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार हे गुप्त ठेवण्यात आलं आहे. एका सिनिअर ऑफिसरनुसार, इवांकाला थांबण्यासाठी काही फाईव्ह स्टार हॉटेल्सची बुकिंग करण्यात आली आहे. इवांका ज्याही मजल्यावर थांबणार त्या मजल्यावर वर आणि खाली कुणालाही थांबण्याची परवानगी नाही. इथे जवान तैनात करण्यात येतील. 

तीन बुलेटफ्रुप कार्स

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इवांकाच्या सुरक्षेत यूएस सीक्रेट सर्व्हिस ने तीन बुलेटप्रूफ लिमोजिन कार्स भारतात पाठवल्या आहेत. या कार्स शमशाबाद एअरपोर्टवर उतरवल्यावर त्या रस्त्याने वेस्टिन हॉटेलमध्ये घेऊन जातील. 

नरेंद्र मोदी-इवांकाची भेट

इसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और इवांका हैदराबाद इंटरनेशनल कनवेंशन सेंटर (HICC)की ओर रुख करेंगे और रात में डिनर के लिए मशहूर फलकनुमा पैलेस जाएंगे.