या राज्यात शाळेत हजेरी देताना आता 'यस सर' नाही

 मध्य प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी आता हजेरी देताना, 'यस सर' नाही, तर

Updated: May 16, 2018, 05:47 PM IST
या राज्यात शाळेत हजेरी देताना आता 'यस सर' नाही title=

भोपाळ : मध्य प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी आता हजेरी देताना, 'यस सर' नाही, तर 'जय हिंद' म्हणणार आहेत. मध्य प्रदेश सरकारने मंगळवारी हे आदेश जारी केले. मध्य प्रदेश सरकारच्या शासन निर्णयात असं म्हटलं आहे, 'विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे'. शासनाने म्हटलं आहे, शाळांमध्ये मुलांची जेव्हा दररोज हजेरी घेतली जाते, तेव्हा नाव पुकारल्यानंतर विद्यार्थी यस सर किंवा आणखी दुसरे अशा प्रकारचे शब्द वापरतात. पण आता वेगवेगळ्या शब्दांचा वापर न करता, शाळेत हजेरीवर नाव पुकारल्यानंतर विद्यार्थी 'जय हिंद' बोलणार आहेत.

विद्यार्थ्यांनी 'जय हिंद' बोलावे

मात्र मध्य प्रदेश सरकारने हजेरी देताना विद्यार्थ्यांनी 'जय हिंद' बोलावे असं म्हटलं असलं तरी या शासन निर्णया अंतर्गत खासगी शाळा येणार किंवा नाही हे स्पष्ट केलेलं नाही. महाराष्ट्रातही अनेक ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये, म्हणजेच पहिले ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळांमध्ये हजेरी देताना मुलं 'जय हिंद' म्हणतात, तर काही ठिकाणी 'येस सर' म्हणतात.