जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सहपत्नीक महात्मा गांधींच्या प्रतिमेला केलं अभिवादन

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादमधून ८ किलोमीटरचा रोड शो करत मोदी आणि आबेंनी साबरमती आश्रमाला भेट दिली.

Updated: Sep 13, 2017, 05:09 PM IST
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सहपत्नीक महात्मा गांधींच्या प्रतिमेला केलं अभिवादन title=

अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादमधून ८ किलोमीटरचा रोड शो करत मोदी आणि आबेंनी साबरमती आश्रमाला भेट दिली.

आश्रमातल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेला खादीच्या धाग्यांचा हार अर्पण करून दोघांनी अभिवादन केलं. त्यानंतर आश्रमातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली. त्यानंतर आबे दाम्पत्य आणि मोदी आपापल्या गाडीनं सीदी सैय्यद मशिदीकडे प्रस्थान केलं. तत्पूर्वी मोदींनी अहमदाबाद विमानतळावर शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं.

मोदींनी शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीचं यांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. आबे यांना अलिंगन देत मोदींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी आबेंना विमानतळावरच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. एअरपोर्टपासून साबरमती आश्रमपर्यंत जवळपास 8 किलोमीटर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे रोड शो केला.