जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा

गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून  जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आलाय. प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत ते...

Updated: Jan 10, 2018, 10:47 PM IST
 जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून  जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आला.  जिग्नेश मेवाणींनीही आता गुजरातच्या सीमा ओलांडत दलित चळवळ देशपातळीवर नेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र ते आजच्या दलित तरुणाला आकर्षित करणार का ? दलित चवळीला नवा चेहरा देणार का ? असे प्रश्न आता पुढे आले आहेत.

जिग्नेश मेवानी.... देशभरात विखुरलेल्या दलित तरुणांचं नेतृत्व करणारा एक उमदा चेहरा.... गुजरातमध्ये जन्मलेल्या या तरुणानं मजबूत संघटन उभं केलं, दिल्लीत हुंकार, महाराष्ट्रात एल्गार, पंतप्रधानांच्या घरासमोर मनुस्मृती आणि संविधान घेऊन तो आंदोलन करतो..... व्यवस्थेशी झगडणारा हा तरुण सध्या अख्ख्या देशाला आणि विशेषतः सत्ताधा-यांना त्याची दखल घ्यायला लावतोय.

जिग्नेश यांचा जन्म मेहसाणा जिल्हयातला.  
मेलेले जनावर आणि त्यांचा मैला उचलायचा नाही, अशी शपथ त्यांनी तिथल्या २० हजार लोकांना घातली.
दलित अस्मिता यात्रा काढली 
ठिकठिकाणी दलितांच्या अस्मितेसाठी लढे दिले 
राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे संयोजक असलेल्या जिग्नेश मेवाणींनी
गुजरातमधल्या ऊनात दलितांना मारहाण झाल्यावर गोरक्षकांविरोधात मोठं आंदोलन उभं केलं
त्यांनी मास कम्युनिकेशन आणि कायद्याचं शिक्षण घेतलंय
काही काळ पत्रकार मुंबईतल्या एका वर्तमानपत्रात काम केलं
पेशानं वकील असलेल्या जिग्नेशला साहित्याचीही आवड आहे 
इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे

समाजकार्यातून राजकीय व्यासपीठावर जाताना योग्य रणनिती आखत जिग्नेश मेवाणीनं काँग्रेसचा पाठिंबा घेतला. आणि आमदार म्हणून निवडून आले.  त्यांनी लक्ष्य केलं थेट नरेंद्र मोदींना.

२०१९ च्या निवडणुकीत लोकसभा लढवण्यासाठी राजकीय जमीन सुपीक करण्याचा जिग्नेश मेवाणींचा प्रयत्न आहे. देशपातळीवर मायावती, रामविलास पासवान, उदित राज असे काही चेहरे सोडले तर दलित तरुणांना ठोस नेतृत्व नाही.

अशा परिस्थिती तरुणांची भाषा बोलणारं, नवं आक्रमक नेतृत्व राजकारणात उदयाला येतंय. कांशीराम यांनी दलितांना एकत्र आणलं तर मायावतींनी तिलक तराजू और तलवारचा नारा देत सोशल इंजिनिअरिंग केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाचा चेहरा बनले आहेत. मोदींच्या चेह-याकडे पाहूनच दलितांनीही मते भाजपच्या झोळीत टाकली. अशावेळी दलितांचा चेहरा बननं हे जिग्नेश समोर मोठं आव्हान आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close