नजरकैदेतील फारूख आणि ओमर अब्दुल्लांना भेटण्यास शिष्टमंडळाला परवानगी

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केले होते.

Updated: Oct 5, 2019, 06:13 PM IST
नजरकैदेतील फारूख आणि ओमर अब्दुल्लांना भेटण्यास शिष्टमंडळाला परवानगी title=

नवी दिल्ली: राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून शनिवारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या शिष्टमंडळाला फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर सरकारकडून फारूख आणि ओमर अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये  स्थानबद्ध करण्यात आले होते.  

तेव्हापासून कोणालाही या दोघांची भेट घेऊन देण्यात आली नव्हती. परंतु, आता नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या शिष्टमंडळाचा त्यांची भेट घेता येईल. या शिष्टमंडळात प्रांतीय अध्यक्ष देवेंदर सिंह राणा आणि पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे. हे सर्वजण रविवारी सकाळी विमानाने जम्मुहून श्रीनगरच्या दिशेने रवाना होतील, अशी माहिती नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते मदन मंटू यांनी दिली. 

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केले होते. फारुख अब्दुल्ला यांना गुपकर रोड येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांना बाहेरच्या लोकांची भेट घेण्याची परवानगी नव्हती. तर ओमर अब्दुल्ला सध्या हरी निवास पॅलेस तर मेहबुबा मुफ्ती श्रीनगरच्या चश्मे शाही येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. 

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी 'या' नेत्याला मिळायचे लाखो रुपये

सध्या सरकारला आगामी काळात काश्मीरमधील राजकारणाचा चेहरा कसा असेल आणि निर्बंध उठवल्यानंतर ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे नेते काय भूमिका घेतील, याची चिंता आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.