रामलीला मैदानात केजरीवाल सरकारचा आज शपथविधी

आम आदमी पार्टीनं ६२ जागा जिंकत दिल्लीचं तख्त राखलं.

Updated: Feb 16, 2020, 07:36 AM IST
रामलीला मैदानात केजरीवाल सरकारचा आज शपथविधी  title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. रामलीला मैदानावर (Ramlila ground) हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी रामलीला मैदानावर सुरू आहे. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण देण्यात आलंय. 

केजरीवालांच्या शपथविधीसाठी अण्णा हजारेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. अण्णा आणि केजरीवाल यांच्यातले दरी आणखी रुंदावल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही दिवसांत दोघांनी ऐकमेकांबाबत चकार शब्दही काढलेला नाही. तर आता केजरीवालांच्या शपथविधीसाठी कोण-कोण उपस्थित राहणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आम आदमी पार्टीनं ६२ जागा जिंकत दिल्लीचं तख्त राखलं. या शर्यतीत भाजप मात्र मागे पडलं. भाजपला दिल्लीत फक्त ८ जागाच जिंकता आल्या. आपनं ७० पैकी ६२ जागा जिंकून तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबिज केली आहे. भाजपला आठ जागा तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.

नेहमी पँट आणि बुशशर्ट, फार तर एखादा मफलर, या चौकटीबाहेर केजरीवाल कधीच पडले नाहीत. २०१२ मध्ये  भ्रष्टाचाराचा सफाया करण्यासाठी केजरीवाल झाडू घेऊन मैदानात उतरले.. आज ते दिल्लीचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. विकासाच्या अतिशय साध्या सोप्या सरळ मॉडेलचे नाव केजरीवाल.