'Dear Heroes....'केरळच्या जोडप्याने सैन्याला पाठवली लग्नपत्रिका

 Indian Army :  भारतीय सैन्याने लग्न पत्रिकेची दखल घेत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत

Updated: Nov 20, 2022, 04:53 PM IST
'Dear Heroes....'केरळच्या जोडप्याने सैन्याला पाठवली लग्नपत्रिका title=

Wedding Invitation : सध्या लग्नाचा सीजन सुरुय आणि अनेकांच्या घरी लग्नासाठी (marriage) निमंत्रणे येत आहेत. लग्नाच्या अनोख्या निमंत्रण पत्रिका (wedding invitation) नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या जोडपी लग्नाच्या फोटोशूटपासून (Photoshoot) ते लग्नाच्या विधींपर्यंत सर्व काही खास करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच आता लग्नाच्या पत्रिका आकर्षक करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण लग्नपत्रिकांमधून सामाजिक संदेशही देत आहेत. अशाच एका जोडप्याची पत्रिका सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतेय. भारतीय सैन्याने (Indian Army) देखील या पत्रिकेची दखल घेतलीय.

केरळमधील (Kerala) एका जोडप्याने भारतीय लष्कराला त्यांच्या लग्नाचे निमंत्रण दिले. निमंत्रण पत्रासोबतच या जोडप्याने एक सुंदर मेसेजही पाठवला आहे. यामध्ये त्यांनी सैन्याचे शौर्य आणि बलिदानाबद्दल आभार मानले. भारतीय लष्करानेही हे निमंत्रण सोशल मीडियावर पोस्ट करून दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सैन्याची ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे.

काय म्हटलंय पत्रिकेत?

'डियर हीरोज, आम्ही (राहुल आणि कार्तिक) १० नोव्हेंबरला लग्न करत आहोत. तुमचे देशाप्रती असलेले प्रेम, दृढनिश्चय आणि देशभक्तीबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. तुमच्यामुळे आम्ही शांततेत झोपू शकतो. तुझ्यामुळेच आम्ही सुखाने लग्न करू शकतोय. या खास दिवशी तुम्हाला आमंत्रित करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्ही यावे आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद द्यावेत अशी आमची इच्छा आहे,' असे या पत्रिकेत म्हटलं आहे.

भारतीय सैन्याने दिल्या शुभेच्छा

भारतीय लष्करानेही लग्नाचे हे आमंत्रण इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केले आहे. 'शुभेच्छा. राहुल आणि कार्तिकाने आम्हाला त्यांच्या लग्नाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या जोडप्याचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले जावो याच आमच्या सदिच्छा," असे भारतीय सैन्याने म्हटलं आहे.

ही पोस्ट एक लाखाहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंटसह व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी या जोडप्याचे लग्नासाठी अभिनंदन केले आणि देशाच्या सशस्त्र दलांचे कौतुक केल्याबद्दल आभार मानले आहेत.