बाळंतपणाच्या 15 तासानंतर BEd ची दिली परिक्षा, प्रेरणादायी कहाणी

राजस्थानमधील (Rajasthan) ढोलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या लक्ष्मीने अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये लहान बाळाला जन्म दिल्यानंतर पेपर दिला.

Updated: Sep 16, 2022, 05:38 PM IST
बाळंतपणाच्या 15 तासानंतर BEd ची दिली परिक्षा, प्रेरणादायी कहाणी title=
Laxmi took the BEd exam after giving birth

आपण सगळेच स्वप्न पाहतो पण खुप कमी लोकांची स्वप्न पूर्ण होतात. पण काही जण असेही असतात जे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्न पूर्ण करतात. अशाच एक महिलेने स्वप्न पाहिलं आणि जिद्दीच्या जोरावर ते पूर्णही केलं, आज ती महिला

जगासमोर आदर्श ठरली आहे. 

ही कहाणी आहे लक्ष्मीची. तिच्या जिद्देची, तिच्या मेहनतीची. या जगात मेहनतीशिवाय काहीच पर्याय नाही. फक्त मेहनत असल्याने सगळं होत नाही तर आपल्यात जिद्दही असणे गरजेचे आहे.

राजस्थानमधील (Rajasthan) ढोलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या लक्ष्मीने अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये लहान बाळाला जन्म दिल्यानंतर पेपर दिला. तिने BEdच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. 6 तारखेला सकाळी पेपर दिला त्याचदिवशी सकाळपासून कळा सुरु झाल्या

होत्या. तेव्हा नवऱ्याने तिची प्रकृती दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी (Doctor) तातडीने डिलेव्हरी करावी लागणार असे सांगितले आणि त्याच दिवशी दुपारी 3:25 मिनिटांनी लक्ष्मीची डिलेव्हरी (Delivery) झाली.

आणखी वाचा : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय ही बाईक, जबरदस्त लूक, पाहा किंमत

लक्ष्मींच्या जिद्देचा प्रवास

राजस्थानमधील ढोलपूरपासून 400 किमी झुझूंन सुरजगड येथे लक्ष्मी या फक्त परिक्षा देण्यासाठी आल्या होत्या. लक्ष्मी यांनी  6 मे ला BEdचा फॉर्म भरला होता तेव्हापासुनच त्यांच्या परिक्षेची (Exam) तयारी सुरु झाली. 31तारखेला परिक्षा देण्यासाठी

ढोलपूरहून सुरजगडला आल्या. त्यांचे आतापर्यंत 4 पेपर झाले होते आणखी 5 पेपर उरले होते.  

सुरजगडमध्ये परिक्षा केंद्रापासून हॉस्पीटल (Hospital) 2 किलोमीटर अंतरावर  होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच पेपर असल्यामुळे त्या अ‍ॅंम्ब्यूलन्सने परिक्षा केद्रांत पोहचल्या. बाळंतपणानंतर त्यांनी पेपर अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये (Ambulance) दिले. 

अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये जायायच्या त्यामध्ये परिक्षा देऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायच्या. बाळाजवळ राहता यावं त्यामुळे त्यांना अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये पेपर द्यावा लागला. 

लक्ष्मी यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर म्हणजेच 15 तासाने BEdचा दुसरा पेपर दिला. ढोलपूरहून फक्त लक्ष्मी या परिक्षा देण्यासाठी सुरजगडला आल्या होत्या. परिक्षा दिली नसती तर एक वर्ष वाया गेले असते असं लक्ष्मी यांनी सांगितले. लक्ष्मीची जिद्द,

मेहनत आणि परिस्थिती पाहून परिक्षा केंद्राने तिला अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये पेपर लिहिण्याची व्यवस्था करुन दिली.

लक्ष्मी यांचे पती शेतकरी आहेत ते रेल्वे भरतीसाठी (Railway Bharti) तयारी करत आहेत. त्यांच्या साथेशिवाय इतका मोठा पल्ला घाठणे कठीण होते असं लक्ष्मी सांगतात. लक्ष्मी असे देखील म्हणाल्या मी जरी गरोदर असले तरी माझी मेहनत मी गरोदर

आहे या कारणासाठी वाया घालवायची नव्हती. 

आणखी वाचा : TRENDING VIRAL शाळेत जायच्या आधी 15 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म.. स्वतः व्हिडीओ शेअर करत म्हणाली...