७० टक्के मतदान संपलं, पण भाजपची खरी लढाई आता सुरु!

लोकसभा निवडणुकीतलं देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडलं आहे.

Updated: May 5, 2019, 04:07 PM IST
७० टक्के मतदान संपलं, पण भाजपची खरी लढाई आता सुरु! title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतलं देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडलं आहे. असं असलं तरी भाजपाची खरी लढाई ही चौथ्या टप्प्यापासून सुरू झाली आहे. आता उरलेल्या तीन टप्प्यांमध्ये २०१४ साली भाजपाने जिंकलेल्या २८२ पैकी ११६ जागा आहेत. त्यामुळे राहिलेल्या १६९ पैकी ११६ म्हणजे जवळजवळ ७४ टक्के जागा भाजपाला राखायच्या आहेत.

उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान या 'काऊ बेल्ट' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीन राज्यांमधील बहुतांश जागांची निवडणूक अद्याप बाकी आहे. या तीन राज्यांसह हिमाचल प्रदेश, झारखंड इथं भाजपाला भरपूर जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही याची कल्पना आहे. त्यामुळेच बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये झालेल्या सभेत त्यांनी पुढचे तीन टप्पे विरोधकांचा किती मोठा पराभव होणार, हे ठरवणार असल्याचं म्हटलं आहे.

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ७ राज्यातील ५१ मतदारसंघात उद्या म्हणजेच सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या १४, मध्य प्रदेशच्या ७, राजस्थानच्या १२, बंगालमधल्या ७, बिहारच्या ५, जम्मू-काश्मीरच्या २ आणि झारखंडच्या ४ जागांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे पुन्हा एकदा लखनऊ मतदार संघातून आपले नशिब आजमावत आहेत. त्यांची स्पर्धाही सपा-बसपा आघाडीच्या उमेदवार पूनम सिन्हा आणि काँग्रेस उमेदवार कलकी पीठचे महंत आचार्य प्रमोद कृष्णम यांची आहे. गेल्या निवडणुकीत राजनाथ या ठिकाणी ७२ हजार मतांनी जिंकले होते. यावेळी त्यांना आपली जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. साधारण तीन दशके या ठिकाणी भाजपाचीच सत्ता आहे. १९९१ पासून इथे भाजपा जिंकत आहे.

गांधी परिवाराची परंपरागत जागा रायबरेली आणि अमेठीत निवडणूक निकाल बदलू शकण्याची शक्यता कमी आहे. रायबरेलीहून सोनीया गांधी पाचव्या वेळेस निवडणूक लढवत आहेत. इखे भाजपाने काँग्रेसचे दिनेश सिंह हे त्यांच्या विरोधात असून ते किती मोठं आव्हान तयार करतात हे पाहणं महत्त्वाचे मित्र आहेत.

या टप्प्यात काँटे की टक्कर अमेठीत पाहायला मिळणार आहे. इथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची लढाई केंद्रीय मंत्री आणि भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर स्मृती इराणी या अमेठीत ठाण मांडून आहेत. त्यांच्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी या ठिकाणी रोड शो केला. मुख्यमंत्री योगी यांच्यासहित अनेक नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.