भोपाळमध्ये पत्रकाराला कोरोना, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित

पत्रकाराला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत होता. 

Updated: Mar 25, 2020, 07:54 PM IST
भोपाळमध्ये पत्रकाराला कोरोना, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित title=
संग्रहित छाया

भोपाळ : मध्य प्रदेशात पत्रकाराला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत होता. आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे त्याची मुलगी आधीक कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.

 मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे पत्रकाराच्या निमित्ताने आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या वेळी एका पत्रकारास कोविड -१९ पॉझिटिव्हची चिन्हे दिसली आहेत. २० रोजी पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावण्यासाठी गेला होता.  

प्रशासनाच्या सल्ल्यानुसार आरोग्य विभागाने या पत्रकाराला विलीगीकरण कक्षात ठेवले आहे.  त्याचा अहवाल आज आला आहे. २० रोजी पत्रकार परिषदेत या पत्रकाराने हजेरी लावली होती. त्यामुळे त्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली असल्याने या पत्रकाराला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. हा साथीचा आजार असल्याने २० तारखेची पत्रकार परिषद कोरोना महामारीच्या सावटाखाली आली आहे. 

आतापर्यंत एकूण १५ प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यातील बहुतांश जबलपूरमध्ये आहेत. जबलपूरमध्ये सहा, इंदूरमध्ये पाच, भोपाळमध्ये २, ग्वाल्हेर आणि शिवपुरी येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडला आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर भोपाळच्या हमीदियामध्ये ६०० बेड आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, सागर आणि रीवा वैद्यकीय महाविद्यालये संबंधित रुग्णालये प्रादेशिक कोरोना रुग्ण उपचार केंद्र बनविण्यात आली.