मध्यप्रदेश: अज्ञात 'गे बॉफ्रेण्ड'च्या शोधात 'गे' स्कॉलरची नैराश्येतून आत्महत्या

नीलोत्पलच्या लैंगिक इच्छांबाबत त्याच्या कुटुंबियांना काहीही माहिती नव्हते. त्याचे वडील निमलेंद्रू हे भआरत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हरिद्वार येथे असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. तर, त्याची आई पेशाने डॉक्टर आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 12, 2018, 03:52 PM IST
मध्यप्रदेश: अज्ञात 'गे बॉफ्रेण्ड'च्या शोधात 'गे' स्कॉलरची नैराश्येतून आत्महत्या title=

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका २७ वर्षीय नॅनोटेक्नॉलॉजी रिसर्चरने तळ्यात उडी घेऊन जीव दिला. नीलोत्पल सरकार असे या तरूणाचे नवा असून, तो देवी कालीचा भक्त असल्याची माहिती आहे. नीलोत्पल हा 'गे' होता. आपल्या 'गे' प्रेमिकाला मिळवण्याच्या नादात त्याने आत्महत्या केली. नीलोत्पलचा मृतदेह तळ्यात तरंगत्या रूपात पोलिसांना रविवारी मिळाला.

दरम्यान,  नीलोत्पलने मनगटावर एक टॅग बांधलेला पोलिसांना आढळला. ज्यावर त्याचे नाव, मोबाईलनंबर आणि घरचा पत्ता होता. पोलिस उपनिरिक्षक राजकुमार गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नीलोत्पलला वाटत असावे की, टॅग पाहून आपला मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यास मदत व्हावी. याच कारणातून त्याने हा टॅग बांधला असावा.

सहकाऱ्यांनाही दिला अजब संदेश

दरम्यान, पोलिसांनी नीलोत्पल राहात असलेल्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अनेक धक्कादायक गोष्टी पहायला मिळाल्या. खोलीतील भिंतींवर विवीध नोट्स लिहीलेल्या चिठ्या चिटकविण्यात आल्या होत्या. त्याने आपल्या सहकारी संशोधकांनाही एक नोट लिहीली होती. यात तो म्हणतो, 'आध्यात्मिक जागरूकतेसाठी मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्ही डार्क मॅटर जाणून घेऊ इच्छिता तर, शिव समजून घ्या. जर तुम्हाला ब्लॅकहोल जाणून घ्यायचे असेल तर,माता कालीला समजून घ्या आणि जर तुम्हाला बिग बॅंगला समजून घ्यायचे असेल तर, तुम्ही ओमची भाषा जाणून घ्या.' 

काही मातेचे स्वप्न पडल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख

चौकशी अधिकारी एएसआय के सी साहू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, घर सोडण्यापूर्वी नीलोत्पलने रात्री उशीरा (१०.०४ वाजता) फेसबुकवर एक अंतीम नोट व्हिडिओ शेअर केला होता. पाच मिनिटांच्या या व्हिडिओत त्याच्या खोलीतील भिंतीचे छायाचित्रण होते. या व्हिडिओत तो म्हणतोय की, '२०१६च्या दिवाळीला मला एक सुंदर स्वप्न पडले. देवी काली माता माझ्या स्वप्नात आली. तिने मला आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद मला गुप्तच ठेवावा लागेल. कारण, जेव्हा मी या आशीर्वादाबाबत बोलेन तो माझ्यासाठी अखेरचा दिवस असेन. खेवटपर्यंत पहा मी असे का करत आहे. तुम्हाला हे स्वप्न काय होते.? ही माझी शेवटचीच नोट का आहे? याबात जरूर माहिती मिळल. पण, त्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद!' 

सेक्स न करताच सूख उपभोगू

दरम्यान, आपल्या नोट्समध्ये नीलोत्पल त्याच्या अपूर्ण प्रेमाबद्धल आणि अज्ञात प्रियकराबद्दल बोलताना दिसतो. त्याने म्हटले आहे की, तो माझ्या जीवनात येईल. माजे जीवन आनंदाने भरून जाईल. तो माझ्यासोबत सेक्स करणार नाही. पण, आम्ही एकमेकांना प्रचंड सुख द्यायचा प्रयत्न करू. आम्ही सूख उपभोगू. ज्या दिवशी मी त्याला प्रपोज करेन त्या दिवशी मी मरून जाईन. तसेच, ज्या दिवशी त्याला हे कळेल की मी त्याच्याचसाठी होतो तेव्हा तो मरून जाईन. मी देवी कालीला प्रार्थना करतो की, ती त्याला कोणतीही इजा होऊ देणार नाही. मी त्याला दु:ख पोहोचवू इच्छित नाही. मी सर्व काही गूढ राखेन. मी त्याच्यासोबत असे काहीच होऊ देणार नाही. पण, याला काही पर्याय आहे काय? मी त्याच्यासोबत लग्न करू इच्छितो. मला देवी काली मातेने सांगितले की, तुम्ही दोघे या जन्मात एकत्र जरूर याल. पण, पुढच्या जन्मातच तुमचे लग्न होईल. त्यासाठी मी देवी कालीला धन्यावद दिले. 

नीलोत्पलच्या सूसाईड नोटमध्ये विचारांची गुंतागूंत

नीलोत्पलची आत्महत्या, त्याची सूसाईड नोट आणि त्याने भिंतीवर लिहीलेला मजकूर हे सर्वच गोंधळात टाकणारे आहे. विशेषत: त्याने त्याच्या मनातील ज्या पद्धतीने व्यक्त केले आहेत ते पाहून त्याच्या मनात काहीतरी गैरसमज किंवा भ्रम असावा. तसेच, तो नैराश्येत असावा असे अनेक अंदाज लावले जात आहेत. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण काय असावे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आई वडील सुशीक्षीत

दरम्यान, नीलोत्पलच्या लैंगिक इच्छांबाबत त्याच्या कुटुंबियांना काहीही माहिती नव्हते. त्याचे वडील निमलेंद्रू हे भआरत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हरिद्वार येथे असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. तर, त्याची आई पेशाने डॉक्टर आहे. त्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.