त्रिपुरामधील भाजपच्या विजयावर बोलल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरामध्ये  भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहेय.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 4, 2018, 04:28 PM IST
त्रिपुरामधील भाजपच्या विजयावर बोलल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरामध्ये  भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहेय.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्रिपुरामध्ये आघाडी करण्यासाठी सांगितली होती. पण त्यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं ममतांनी म्हटलं आहे. हा भाजपचा विजय नसून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१९ मध्ये भाजपचा पराभव होईल असा दावा त्यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, 'त्रिपुरामध्ये हा भाजपचा विजय नसून कम्युनिस्ट पक्षाचा पराभव आहे. अंहकार, अनैतिकता आणि पूर्णपणे गुडघे टेकल्यामुळे हा पराभव झाला. त्यांनी त्रिपुरामध्ये पाण्यासारखा पैसा ओतला. ईव्हीएममध्ये गडबड केली.'

ममतांनी पुढे म्हटलं की, 'मी राहुल गांधी यांना त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेस आणि तेथील छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा आग्रह केला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जर आघाडी झाली असती तर भाजपला थांबवता आलं असतं.'