२४५ रुपयांची रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का?

कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट आवश्यक 

Updated: Apr 27, 2020, 04:39 PM IST
२४५ रुपयांची रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का? title=

मुंबई : कोरोनाच्या चाचणीकरता चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट खरेदी करण्यात आले. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (ICMR) ला २४५ रुपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट ६००रुपये प्रति किट दरात खरेदी करावी लागली. सरकार यावर स्पष्टिकरण देईल अशी मागणी काँग्रेसकडूनही करण्यात आली आहे. 

दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत खटला सुरू होता.  भारतात आयात करण्यात आले तेव्हा २४५ रुपये प्रति किटला आकारले गेले. मात्र ICMR हे किट ६०० रुपयाला विकले. यामध्ये त्यांनी १४५% फायदा घेतला.दिल्ली उच्च न्यायालयात जस्टिस नाजमी वजीरीच्या सिंगल बेंचने याचा दर ३३% कमी करून प्रति कीट ४०० रुपयाला विकण्याचे आदेश दिले आहे. या किटवर वितरकाला ६१%  फायदा मिळत आहे. 

कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्याची विक्री कमी किंमतीत होणं आवश्यक असल्याचंही न्यायालयाने सांगितलं आहे. चीनमधून १०लाख टेस्टिंग किट आणण्याचं कंत्राट ज्या कंपन्यांकडे आहे त्या दोन कंपन्यांना उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. ('पैसे उकळणाऱ्या ICMR ला जनता कधीच माफ करणार नाही') 

 

या प्रश्नावर राहुल गांधींनी ट्विट देखील केलं आहे? अशा संकट समयी देखील फायद्याचा विचार केला जातोय. याला देशाची जनता माफ करणार नाही. 'जेव्हा संपूर्ण देश Covid-19 या संकटाशी लढत आहे. तेव्हा ही काही लोकं स्वतःचा फायदा कसा करावा याचा विचार करतात. या भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते. घृणास्पद आहे सगळं. मी पंतप्रधानांकडे मागणी करतो की, अशा फायद्याचा विचार करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. देश त्यांना कधीच माफ करणार नाही.' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.