'पैसे उकळणाऱ्या ICMR ला जनता कधीच माफ करणार नाही'

राहुल गांधींचं रॅपिड टेस्ट किटवर ट्विट 

Updated: Apr 27, 2020, 02:04 PM IST
'पैसे उकळणाऱ्या ICMR ला जनता कधीच माफ करणार नाही' title=

मुंबई : चीनने Covid-19 च्या रॅपिड टेस्टची किट भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद म्हणजे ICMR ला २४५ रुपयाला देण्यात आले. यामध्ये ICMR ने ५ लाख किटची ऑर्डर ही प्रति ६०० रुपये दराने दिली. यामुळे खूप मोठा घोटाळा समोर आला आहे. या संकाटाच्या काळातही फायद्याचा विचार केला जात आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेता राहुल गांधी हे सगळं घृणास्पद असल्याचं म्हटलं आहे. 

'जेव्हा संपूर्ण देश Covid-19 या संकटाशी लढत आहे. तेव्हा ही काही लोकं स्वतःचा फायदा कसा करावा याचा विचार करतात. या भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते. घृणास्पद आहे सगळं. मी पंतप्रधानांकडे मागणी करतो की, अशा फायद्याचा विचार करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. देश त्यांना कधीच माफ करणार नाही.' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

कोविड-१९ च्या रॅपिड टेस्टच्या आयात आणि निर्यातीच्या मुद्यावरून दिल्लीच्या उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हे किट भारतात आयात करण्यात आले तेव्हा २४५ रुपये प्रति किटला आकारले गेला. मात्र ICMR हे किट ६०० रुपयाला विकले. यामध्ये त्यांनी १४५% फायदा घेतला.

दिल्ली उच्च न्यायालयात जस्टिस नाजमी वजीरीच्या सिंगल बेंचने याचा दर ३३% कमी करून प्रति कीट ४०० रुपयाला विकण्याचे आदेश दिले आहे. या किटवर वितरकाला ६१%  फायदा मिळत आहे.