मॅकडोनाल्डसची भारतातील १६९आउटलेट्स आजपासून बंद

भारतीयांना बर्गर, फ्रेंज फ्राईज सारख्या पदार्थांची ओळख  करून देणार्‍या मॅकडॉनल्ड या जगप्रसिद्ध फास्ट फूट चेनची भारतातील १६९ रेस्टॉरंट्स आजपासून बंद होणार आहेत.

Updated: Sep 6, 2017, 10:00 AM IST
 मॅकडोनाल्डसची भारतातील १६९आउटलेट्स आजपासून बंद  title=

दिल्ली : भारतीयांना बर्गर, फ्रेंज फ्राईज सारख्या पदार्थांची ओळख  करून देणार्‍या मॅकडॉनल्ड या जगप्रसिद्ध फास्ट फूट चेनची भारतातील १६९ रेस्टॉरंट्स आजपासून बंद होणार आहेत.

मॅकडोनाल्डसचे सर्व हक्क असलेल्या कनॉट प्लाझा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल) आणि मॅकडोनाल्डसमध्ये वाद झाल्याने त्यांच्यामधील करार आज संपुष्टात आला आहे. 
 
आजपासून मॅकडोनाल्डसचे नाव, ट्रेडमार्क आणि लोगो सीपीआरएल या कंपनीला यापुढे वापरता येणार नाही. परिणामी उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डचच्या १६९ रेस्टॉरंट्सना टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. 
 
 मॅकडोनाल्डस बरोबरचा करार संपुष्टात आल्यानं सीपीआरएलने २९ जून २०१७ रोजी दिल्लीतील ५५ पैकी ४३ मॅकडोनाल्डस रेस्टॉरन्ट बंद केली आहेत. दरम्यान, सीपीआरएलचे प्रमुख विक्रम बख्शी यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये दाखल केलेली याचिकादेखील मंगळवारी रद्द करण्यात आली. मात्र ही लढाई पुढे चालू ठेवून बुधवारी नॅशनल कंपनी लॉ अपिट ट्रिब्यूनलमध्ये जाणार असल्याचे  विक्रम बख्शी यांनी सांगितले आहे.