सुनेविरुद्ध सासूचं जबरदस्त प्लॅनिंग, सूनही होती हुशार, पुरावे गोळा केले आणि थेट गाठलं स्टेशन

आपल्याकडे हुंडा घेण्याची वाईट परंपरा अजूनही सुरु आहे. यासाठी विविध पद्धतीने सुनेला त्रास देणं, तिच्याकडून पैशांची मागणी करणं पाहायला मिळतं. अशात हुंडा मागण्याची एक आगळी वेगळी घटना आता समोर येतेय. एका सुनेचं तिच्याच सासूने आणि नंडेने इंस्टाग्राम हॅक केल्याची माहिती समोर येतेय. एवढंच नाही तर त्यानंतर, या दोघीनी सुनेकडून त्याबदल्यात पैसेही उकळण्याचा प्रयत्न केला.     

Updated: Aug 20, 2022, 12:04 AM IST
सुनेविरुद्ध सासूचं जबरदस्त प्लॅनिंग, सूनही होती हुशार, पुरावे गोळा केले आणि थेट गाठलं स्टेशन title=

आपल्याकडे हुंडा घेण्याची वाईट परंपरा अजूनही सुरु आहे. यासाठी विविध पद्धतीने सुनेला त्रास देणं, तिच्याकडून पैशांची मागणी करणं पाहायला मिळतं. अशात हुंडा मागण्याची एक आगळी वेगळी घटना आता समोर येतेय. एका सुनेचं तिच्याच सासूने आणि नंडेने इंस्टाग्राम हॅक केल्याची माहिती समोर येतेय. एवढंच नाही तर त्यानंतर, या दोघीनी सुनेकडून त्याबदल्यात पैसेही उकळण्याचा प्रयत्न केला.     

काय म्हणणं आहे सुनेचं? 

तक्रारदार सुनेनं तिच्या सासूवर आणि नंडेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सुनेचं म्हणणं आहे की, तीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करून तिला बदनाम करण्याची धमकी देण्यात आली. त्याबदल्यात सासूने आणि नंडेने तिच्याकडून माहेरून पैसे घेऊन येण्याची मागणी केली. याबाबत सुनेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

समोर येणाऱ्या माहितीनुसार 4 वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालेलं. लग्नानंतर काही महिने चांगले गेलेत. मात्र लग्नाच्या तीन वर्षानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी सुनेचा छळ करण्यास सुरूवा केली. सासू आणि नंडेकडून हा त्रास सुरु होता.

रिपोर्टनुसार, जेंव्हा सुनेनं माहेरहून पैसे आणण्यास विरोध केला तेंव्हा सासू आणि नंडेने  तिचं इंस्टाग्राम हॅक करून तिला त्रास देण्यास सुरवात केली. सुनेच्या माहितीनुसार तिच्या अकाऊंटवरून विविध प्रकारचे मेसेजेस आणि फोटो व्हायरल करून तिला त्रास देण्यास सुरवात केली.
 
आयडी हॅक केल्याप्रकरणी पीडित महिला आणि तिच्या नवऱ्याने सायबर पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली आहे. लेखी तक्रारीनंतर सायबर पोलीस आता याबाबत पुढील तपास करत आहेत. सदर प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. 

mother in law and sister in lawa hacked instagram account  of daughter in law for dowry