जुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला... कारण वाचून बसेल धक्का

जुळ्या मुली झाल्याचा त्याला रुग्णालयातून फोन आला, पण आनंद होण्याऐवजी त्याने थेट नदी उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं कारण

Updated: Jan 20, 2023, 07:15 PM IST
जुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला... कारण वाचून बसेल धक्का title=

Crime News : जुळ्या मुलींचा (Twin Girls) जन्म झालेल्या एका व्यक्तीने नदीत उडी मारत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास सात तासांच्या शोधकार्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची (Sudden Death) नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे. या व्यक्तीची पत्नी गरोदर (
Pregnant) होती, तिला रुग्णालयात (Hospitalise) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिला. याची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला फोन करुन दिली. पण ते ऐकताच त्या व्यक्तीने नदीत उडी मारून जीव दिला. 

काय आहे नेमकी घटना?
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बालाघाटमधली ही घटना आहे. मृत व्यक्तीचं नाव वासूदेव असं होतं. 18 जानेवारीला संध्याकाळी सात वाजता वासूदेवला रुग्णालयातून फोन आला, त्याच्या पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिल्याची माहिती त्याला देण्यात आली. पण गोष्ट ऐकताच वासूदेवने वैनगंगा नदीत (Vainganga River) उडी मारत आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत वासूदेवला याआधी दोन मुली आहेत. आता पुन्हा एकदा त्याच्या पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे वासूदेव नैराश्यात होता. 

वासूदेव हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो कार मॅकेनिक म्हणून काम करायचा, यातून त्याची रोजची 500 रुपये कमाई होती. त्याच्या नावावर थोडीफार जमीनही होती. यात तो काही पिकंही घेत होता. वासूदेवला 6 आणि 4 वर्षांच्या मुली असून बुधवारी त्याच्या पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चार मुलींचं पालन पोषण कसं करायाचं या चिंतेत वासूदेव होता. यातून त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं.

दुसरी मुलगी झाल्याने घोटला गळा
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातही अशीच एक दुर्देवी घटना घडली होती. पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी जन्माला आल्याने जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या मुलींचा गळा दाबून तिची हत्या केली. रेखा चव्हाण असं त्या निर्दयी आईचं नाव आहे. 27 डिसेंबरला रेखा चव्हाण प्रसूतीसाठी काटगाव वसंत नगर इथल्या कासार जवळा प्राथमिक आरोग्या केंद्रात दाखल झाली. तीने गोंडस मुलीचा जन्म दिला. पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी होईल अशी अपेक्षा तिला होती. 

पण दुसरीही मुलगीच झाल्याने रेखा चव्हाण नैराश्यात होती. यातूनच तीने 29 डिसेंबरला रुमालाने बाळाचा गळा दाबून हत्या केली. या घटनेने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मुलीच्या हत्येप्रकरणी रेका चव्हाणला अटक करण्यात आली असून तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.