जर पोलिसांनी त्या रात्री गर्लफ्रेंडला पकडलं नसतं, तर बॉयफ्रेंडच्या हत्येचं गुढं कदाचित उलगडलंच नसतं

महिलेने पोलिसांपासून सुटका करण्यासाठी मोठा कट रचला, ज्याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे. मात्र असे असूनही त्या गर्लफ्रेंडला पोलीसांनी अटक केलीच.

Updated: Aug 8, 2022, 09:16 PM IST
जर पोलिसांनी त्या रात्री गर्लफ्रेंडला पकडलं नसतं, तर बॉयफ्रेंडच्या हत्येचं गुढं कदाचित उलगडलंच नसतं title=

मुंबई : प्रेम आणि प्रेम विवाह हे लोकांसाठी आता कॉमन झालं आहे. त्यात आता बहुतांश लोक हे लिव्ह-इन रिलेशनशिपकडे देखील वळले आहे.  लिव्ह-इनमध्ये राहाणं आता ट्रेंड होऊ लागलं आहे. असं असलं तरी प्रेम आणि भांडणं ही सगळ्याच नात्यामध्ये होत असतात. परंतु एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. कारण या प्रकरणात बॉयफ्रेंड असं काही करुन बसला की, त्याची खूप मोठी शिक्षा त्याला भोगावी लागली.

हा खळबळजनक प्रकार गाझियाबादमधून समोर आला आहे, ज्यात एका महिलेने आपल्या पुरुष साथीदाराची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे क्षुल्लक कारणावरून या गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. (criminal lovestory)

यानंतर महिलेने पोलिसांपासून सुटका करण्यासाठी मोठा कट रचला, ज्याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे. मात्र असे असूनही त्या गर्लफ्रेंडला पोलीसांनी अटक केलीच.

ही घटना शनिवारी रात्रीची असल्याचे सांगितले जात आहे. त्यादिवशी पोलिस गस्तीदरम्यान एक महिला एक जड ट्रॉली बॅग ओढताना आढळली. या महिलेने रात्री गस्ती पथकाचे वाहन पाहिल्यानंतर ती घाबरली आणि रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न करू लागली. महिलेचा हा प्रकार पाहून पोलिसांना संशय आला, म्हणून त्यांनी त्या महिलेला थांबवली आणि बॅगची झडती घेतली. बॅग उघडताच त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस पथकाच्या संवेदना उडाल्या.

चौकशीत महिलेने आपले नाव प्रीती शर्मा असल्याचे सांगितले आहे. महिलेला मृतदेहाबाबत विचारले असता तिने सांगितले की, हा मृतदेह तिचा लिव्ह-इन रिलेशनशिप पार्टनर फिरोजचा आहे. 

या महिलेचं आधी लग्न झालं होतं, त्यानंतर ती आपल्या नवऱ्याला सोडून गेल्या ३-४ वर्षांपासून आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती. यानंतर ६ ऑगस्टच्या रात्री दोघांमध्ये लग्न करण्यावरून वाद झाला.

खरंतरा फिरोज, प्रितीला लग्नासाठी दबाव टाकत होता. परंतु प्रिती लग्नासाठी तितकीशी तयार नव्हती, त्यामुळे मग भांडणात फिरोजने प्रितीवर आरोप लावले की, "तु खूप चालू महिला आहेस, तु तुझ्या नवऱ्याची होऊ शकली नाहीस, तर माझी काय होशील?"

त्यानंतर प्रितीचं डोकं फिरलं आणि तिने फिरोजचा गळा कापून हत्या केली. तसेच या सगळ्यापासून वाचण्यासाठी प्रितीने एक प्लान देखील आखला. तिने आपल्या बॉयफ्रेंडचा मृतदेह ट्रेनमधून फेकण्याचे ठरवले, ज्यामुळे ती या सगळ्यामध्ये अडकणार नाही. ज्यामुळे तिने मोठी ट्रॉली बॅग घेतली आणि बॉयफ्रेंडचा मृतदेह त्यामध्ये भरला.

यानंतर प्रिती रस्त्याने जात असताना गस्ती घालणाऱ्या पोलिस पथकाला तिच्यावर संशल आला आणि त्यांनी तिची तपासणी घेतली असता. हा सगळा प्रकार उघड झाला.

खरंच जर पोलिसांनी प्रितीला त्या रात्री पकडलं नसतं, तर फिरोजच्या हत्येचं गुढं कदाचित उलगडलं नसतं. (perfect murder plan girlfriend made but she caught by police)

रात्रीच प्रीतीने घरात ठेवलेल्या वस्तराने फिरोजचा गळा चिरला आणि त्यानंतर मृतदेह ठेवण्यासाठी सकाळी सीलमपूर येथून मोठी ट्रॉली बॅग आणली.

काल रात्री प्रीती फिरोजचा मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवून गाझियाबाद रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये ठेवणार होती. मात्र यावेळी गस्त घालणाऱ्या पथकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याचा खेळ उघड झाला. मृत फिरोज हा दिल्लीत न्हाव्याचे काम करत होता.