शिका आणि कमवा! राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम अंतर्गत पदवीधरांना संधी,कुठे पाठवाल अर्ज?

NHPC Bharti 2024: एनएचपीसी अंतर्गत पदवीधर शिकाऊ पदांच्या एकूण 67 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु आहे.

Pravin Dabholkar | Updated: Apr 6, 2024, 01:50 PM IST
शिका आणि कमवा! राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम अंतर्गत पदवीधरांना संधी,कुठे पाठवाल अर्ज? title=
NHPC Bharti 2024

NHPC Bharti 2024: ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? थांबा तुम्हाला लगेच कोणी भरपूर पगाराची नोकरी देणार नाही. कारण त्याआधी तुमच्याकडे संबंधित कामाचे स्किल असणे आवश्यक आहे. अनेक कंपन्या प्रशिक्षणार्थींना आपल्याकडे नोकरीची संधी देतात. यावेळी भलेही तुम्हाला पगार कमी मिळेल पण तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्हाला शिकायला खूप मिळेल.
अशीच एक भरती एनएचपीसीमध्ये सुरु आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा तपशील देण्यात आला आहे. 

एनएचपीसी अंतर्गत पदवीधर शिकाऊ पदांच्या एकूण 67 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. अप्रेंटिस किंवा पदवीधर शिकाऊ असे या पदाचे नाव असून याच्या एकूण 67 जागा भरल्या जाणार आहेत. 

इलेक्ट्रीशनच्या 25 जागा, फिटरच्या 6 जागा, मॅकेनिक (मोटर व्हिकल)च्या 2 जागा, टर्नर आणि मॅकेनिस्टची प्रत्येकी 1 जागा, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रीक) च्या 2 जागा, कोपाच्या 13 जागा भरण्यात येणार आहेत. हा तपशील 50 जागांचा आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एनसीव्हीटी, एससीव्हीटी यापैकी कोणत्याही ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 

तर दुसऱ्या भरतीत इलेक्ट्रीकलच्या 8 जागा, सिव्हिलच्या 3 जागा, मॅकेनिकलच्या 4 जागा, आयटी/कॉम्प्युटर सायन्सच्या 2 जागा अशा 17 जागा भरल्या जाणार आहेत.
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केलेली असावे. एआयसीटीई मान्यताप्राप्त 4 वर्षाचा नियमित बीटेक कोर्स पूर्ण केलेला असावा.किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल वय 30 वर्षे इतके आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑफलाईन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. 12 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घ्या. अर्जासोबत खरी माहिती भरा. कागदपत्रांची पडताळणी करताना खोटी माहिती आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

21 व्या वर्षी तुमचे मुल होईल करोडपती, इन्व्हेस्टमेंटची 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी येथे क्लिक करा