मोदींच्या फिटनेस व्हिडिओवर ३५ लाख फस्त?

मोदींचा फिटनेस व्हिडिओ म्हणून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर आल्या. पुन्हा एकदा हा व्हिडिओ आणि त्याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या चर्चेचे कारण हा व्हिडिओ बनविण्यासाठी आलेला खर्च.

Updated: Jul 3, 2018, 10:25 AM IST
मोदींच्या फिटनेस व्हिडिओवर ३५ लाख फस्त? title=

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योगासन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मोदींचा फिटनेस व्हिडिओ म्हणून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर आल्या. या व्हिडिओची देशभरात चर्चा झाली. योगदिन संपताच या चर्चाही संपल्या. पण, आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ आणि त्याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या चर्चेचे कारण हा व्हिडिओ बनविण्यासाठी आलेला खर्च.

 मोदींचा 'तो' व्हिडिओ पुन्हा व्हायरल 

योगासने करतानाचा मोदींचा व्हिडिओ (फिटनेस व्हिडिओ) तयार करण्यासाठी आलेल्या अंदाजे खर्चाची रक्कम सांगणारे एक वृत्त  scoops.indiascoops.com या संकेतस्थळाने शनिवारी प्रसिद्ध केले. या वृत्तात पंतप्रधान कार्यालयाने हा व्हिडिओ बनविण्यासाठी चक्क ३५ लाख रूपये खर्च केले. तसेच, आंतरराष्ट्रीय योगदिनी जाहिरात आणि इतर गोष्टींसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्तामुळे देशभरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा मोदींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर टीकाही सुरू झाली आहे.

 

ट्विटरवर सामना

दरम्यान, या वृत्तानंतर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. खास करून काँग्रेस विरूद्ध भाजप, असा सामना ट्विटरवर पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या खास शैलीत ट्विट केले. त्याला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ‘योगदिनी जाहिरातींवर २० कोटी रुपये खर्च आणि मोदींच्या फिटनेस व्हिडीओसाठी ३५ लाख रुपये खर्च केला, हे लाजिरवाणं आहे. हे सरकार केवळ दिखावा करणारं सरकार आहे’,अशी टीका थरूर यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.

मोदींच्या फिटनेस व्हिडिओवर ३५ लाख फस्त? | No Money Was Spent on PM's Fitness Challenge Video: Rajyavardhan Rathore