Optical Illusion : 1,2,3 की.... 'या' चित्रात नेमके हत्ती आहेत तरी किती; एकदा पहिल्यावर कळणारचं नाही

Optical Illusion: हल्ली सगळीकडेच ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. आपल्यालाही असे इल्यूजन पाहून गंमत वाटते आणि काहीतरी हटके कोडं असेल तर ते सोडवू आपल्या बुद्धीची परीक्षाही (brain teaser) घ्यायची असते. 

Updated: Dec 11, 2022, 06:06 PM IST
Optical Illusion : 1,2,3 की.... 'या' चित्रात नेमके हत्ती आहेत तरी किती; एकदा पहिल्यावर कळणारचं नाही title=
फोटो सौजन्य : वाइल्डलेन्स इको फाउंडेशन ((@WildLense_India)

Optical Illusion: हल्ली सगळीकडेच ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. आपल्यालाही असे इल्यूजन पाहून गंमत वाटते आणि काहीतरी हटके कोडं असेल तर ते सोडवू आपल्या बुद्धीची परीक्षाही (brain teaser) घ्यायची असते. आपली बुद्धी तपासण्यासाठी आपल्या कमीत कमी कालावधीत एखादी लपलेली गोष्ट शोधून काढायची असते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो एका आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केली आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की या फोटो चार हत्ती (elephants) आहेत. तेव्हा तुम्हाला या फोटोत दिसताना चार हत्ती दिस असले तरी या फोटोत वास्तविक त्याहून जासत हत्ती आहेत. तुम्हाला काही सेकंदात या फोटोत किती हत्ती लपले आहेत हे शोधून काढायचे आहेत. (optical illusion try to find out 7 elephants from the photo)

हा फोटो व्हायरल (viral photo) झाल्यानंतर या फोटोतील हत्ती शोधण्यासाठी अनेकांनी तारेवरची कसरत केली आहे. या फोटोला अनेकांनी शेअर केले आहे तर अनेकांनी या फोटोवर अनेक कमेंट्सही केल्या आहेत. सध्या या फोटोसह व्हायरल होणाऱ्या ट्विटला (tweet) दोन हजाराहून जास्त लाईक्स शंभरच्या वर रिट्विट्स आले आहेत. 

आता तुम्हीही शोधून शोधून कदाचित थकला असाल. कारण अनेकांना दिसताना यात जरी चार हत्ती दिसत असले तरी या फोटो एकूण सात हत्ती आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का होय, भल्या भल्यांची बुद्धी यंदा कामी आली नाही. हे छायाचित्र ज्या फोटोग्राफरनी काढले आहे त्यांना हा क्षण टिपण्याच्या हजाराच्या वर छायाचित्र काढावी लागली होती. 'वाइल्डलेन्स इको फाउंडेशन' (@WildLense_India) या अकांऊटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत मोठ्या वयाचे हत्ती आहेत त्याचबरोबर पिल्लंही आहेत.

हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की फोटोत जरी तुम्हाला चार हत्ती दिसत असले तरी प्रत्यक्षात यात सात हत्ती आहे. हा फोटो काढताना फोटोग्राफरने खूप मेहनत तर घेतली आहेच परंतु तुमच्या बुद्धी कौशल्याला दाद देणेही महत्त्वाचे आहे. काहींना कदाचित या फोटोतून पटकन सात हत्ती शोधता आले असतीलही तर काहींनी यातून अपयशही आले असले परंतु या व्हिडीओ फार इंटरेस्टिंग असून तो सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे.