पाकिस्तानात बनवलेल्या सरबताची भारतात सर्रास विक्री; हायकोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश

अ‍ॅमेझॉनवर या उत्पादनाची सहजरित्या विक्री केली जातेय  

Updated: Nov 16, 2022, 08:40 AM IST
पाकिस्तानात बनवलेल्या सरबताची भारतात सर्रास विक्री; हायकोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश title=

Delhi High Court : भारताचा शेजारी पाकिस्तान (Pakistan) गेल्या अनेक वर्षांपासून देशात घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. विविध मार्गांनी भारतात दहशत माजवण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानकडून सातत्याने होताना दिसत आहे. सीमाभागत घुसखोरी करुन दहशतवादी कारवाया (terrorist activity) केल्या जात आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपल्यावर अन्याय करतो पाकिस्तान ओरडून सांगत असतो. पण आता पुन्हा एकदा पाकिस्तान कंपन्यांच्या माध्यमातून देशात घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका पाकिस्तानी कंपनीबाबत कठोर निर्णय देत त्यावर बंदी घातली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

दिल्ली उच्च न्यायालयाने अॅमेझॉनला (Amazon) रूह अफजा (Rooh Afza) नावाने पाकिस्तानी उत्पादने विकणाऱ्या पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी घालण्यास सांगितले आहे. याबाबत हमदर्द (hamdard) यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली होती. उच्च न्यायालयाने हमदर्द यांच्या बाजूने निकाल देत पाकिस्तानी कंपन्यांवर (pakistan company) बंदी घालण्यास सांगितले. हमदर्दने 1907 मध्ये रूह अफजा ब्रँड अंतर्गत सरबत बनवण्यास सुरुवात केली होती. या नावाखाली कंपनी दरवर्षी सुमारे 200 कोटी रुपयांची उत्पादने विकते. 'पाकिस्तानी कंपन्याही हमदर्द या ब्रँडच्या नावाखाली भारतात घुसखोरी करत आहेत. अॅमेझॉनने या उत्पादनांच्या कंपन्यांवर बंदी घालावी,' असे आदेश न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी दिले आहेत. 'रुह अफजा' हा भारतातील हमदर्द कंपनीच्या मालकीचा ब्रँड आहे. 1907 मध्ये 'रुह अफजा' हे चिन्ह स्वीकारणाऱ्या हमदर्दच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिला.

रूह अफजाच्या नावाखाली पाकिस्तानी सरबत

हमदर्द दवाखाना आणि हमदर्द नॅशनल फाऊंडेशन यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि गोल्डन लीफ यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. गोल्डन लीफ नावाची कंपनी अॅमेझॉनवर रुफआफजा नावाने सरबत विकत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. आमच्या ब्रँडच्या नावाने विकले जाणारे हे सरबत पाकिस्तानमध्ये बनवले जाते. तसेच ते अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याच्या मानकांची पूर्तता करत नाही, असा दावा हमदर्दने केला होता.

"आम्ही स्वतः तीन वेळा या उत्पादनाची खरेदी केली आहे. प्रत्येकवेळी हे हे उत्पादन हमदर्द लॅबोरेटरीज (वक्फ) पाकिस्तानने तयार केल्याचा दावा केला होता," असेही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.