६० वर्षांवरील नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजना

प्रधानमंत्री वय वंदन योजना ही 60 वर्षांवरील नागरिकांसाठी भारत सरकारची पेन्शन योजना आहे. 

Updated: Jul 21, 2017, 04:50 PM IST
६० वर्षांवरील नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजना title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजनेचा शुभारंभ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री वय वंदन योजना ही 60 वर्षांवरील नागरिकांसाठी भारत सरकारची पेन्शन योजना आहे. 

4 मे 2017 ते 3 मे 2018 या कालावधीमध्ये ही योजना उपलब्ध राहिल. एलआयसीच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरुपात या योजनेचा फायदा घेता येईल. एकरकमी गुंतणुकीतून दहा वर्षं पेन्शन मिळवणं या योजनेनुसार शक्य होणार आहे. 

ही योजना 10 वर्षांसाठी असून यावर प्रतिवर्षी 8 टक्के रिटर्न मिळणार आहे. पेन्शनधारकांना मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक स्वरुपात या दहा वर्षाचं पेन्शन मिळू शकतं. या योजनेवर जीएसटीमधून सूट देण्यात आलीय. 

या योजनेनुसार स्वतः किंवा पती-पत्नी या दोघांपैकी एकाच्या गंभीर आजाराच्या वेळी मुदतपूर्व लाभ घेता येणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या 98 टक्के रक्कम परत देता येईल.