House Insurance | गृहविमा म्हणजे काय? चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मिळणार भरपाई

आपल्या घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

Updated: Dec 23, 2021, 03:49 PM IST
House Insurance | गृहविमा म्हणजे काय? चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मिळणार भरपाई title=

मुंबई : आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न आपल्या सर्वांचे असते, त्याच्या देखभालीसाठी आणि सजावटीसाठी आपण अनेक प्रकारचे खर्च आणि गुंतवणूक करतो. म्हणूनच येणाऱ्या धोक्यांपासून आपल्या घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेक वेळा पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्याला व आपल्या घराचे मोठे नुकसान सहन करावे लागते. आपण या नैसर्गिक आपत्तींना रोखू शकत नाही, परंतु आपण कोणत्याही प्रकारच्या येऊ घातलेल्या धोक्यासाठी तयार राहू शकतो आणि नुकसानातून सावरण्यासाठी नियोजन करता येते. त्यामुळे गृहविम्याचे महत्त्व वाढते.

गृह विमा म्हणजे काय?

ज्याप्रमाणे आपण स्वत:साठी आरोग्य विमा घेतो ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराच्या बाबतीत आपल्याला संरक्षण मिळते, त्याचप्रमाणे घराचा विमा देखील कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास आपल्या घराला संरक्षण देतो. हे नुकसान मानवाद्वारे किंवा अगदी नैसर्गिक देखील असू शकते.

भूकंप, पूर, चक्रीवादळ तसेच आग यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत चांगली विमा योजना तुम्हाला आर्थिक मदत पुरवते.

तुम्हाला अनेक प्रकारच्या पॉलिसी पहायला मिळतात, परंतु अशी पॉलिसी घेण्याचा प्रयत्न करा जे पूर्णपणे सर्वसमावेशक असेल. यामध्ये दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे.

या गोष्टी करण्याची करा खात्री 

घराच्या विम्यासाठी विमा दावा दाखल करताना, तुमच्याकडे सर्व आवश्यक तपशील असल्याची खात्री करा. सर्व कंपन्या तुम्हाला दावे दाखल करण्यासाठी वेगळी वेळ देतात. त्यांच्यात राहून तुमचा दावा मांडावा लागेल.

लक्षात ठेवा की जर तुम्हाला तुमच्या घरात काही बदल करायचे असतील तर तुमच्या प्रीमियमवरही याचा परिणाम होतो.

तुमच्यासाठी योग्य योजना कशी निवडावी?

गृह विम्याची निवड करताना, एक योजना निवडा जी तुम्हाला घरातील वस्तूंसाठी देखील कव्हर करेल. उद्या जर तुमच्या घरात चोरी झाली असेल ज्यामध्ये फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे इत्यादी मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाले असेल तर एक चांगली योजना तुम्हाला या सर्वांसाठी संरक्षण देईल.

याशिवाय कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे घर कोसळले तर ही कंपनी तुम्हाला नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक मदतही देते.