सोमवारी पेट्रोल, डिझेल एवढं महागलं

काय आहेत आजचे दर 

सोमवारी पेट्रोल, डिझेल एवढं महागलं  title=

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांना लागलेली आग विझण्याचं नाव घेत नाही. सोमवारी देखील पेट्रोल - डिझेलच्या दरात चांगलीच वाढ झाली आगे. सोमवारी पेट्रोलच्या दरात 15 पैशांनी वाढ झाली असून आता पेट्रोलचा दर 82.06 रुपये प्रती लीटर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या दरात 6 पैशांनी वाढ झाली असून आताचा दर हा 73.78 रुपये प्रति लीटर आहे. सोमवारी या दरांनी उंची गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर लवकर 90 रुपये प्रती लीटरचा आकडा गाठणार आहेत. 

रविवारी हे होते दर रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 28 पैसे प्रती लीटर वाढ झाली होती. तेव्हा त्याचा दर 81.91 रुपये प्रती लीटर होते. तर डिझेलचा दर 18 पैसे प्रति लीटर वाढून 73.72 रुपये प्रती लीटर झालं आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 35 पैसे वाढ झाली आहे. यानंतर पेट्रोलचे दर है 81.63 रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेलच्या दरात 24 पैसे वाढ झाली आहे. आणि दर 73.54 रुपये प्रति लीटर आहे.

दर आणखी वाढण्याची शक्यता 

तज्ञांच्या माहितीनुसार, आगामी काळात भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार आहे. हे दर गगनाला भिडणार आहेत. पेट्रोव - डिझेलच्या दर वाढी मागे रुपया  हे सर्वात मोठं कारण  आहे. रुपयांत घसरण होत असल्यामुळे तेल कंपन्यादेखील या दरात सतत बदल करत आहे. कंपनी डॉलरमध्ये तेलाचा दर ठरवते. त्यामुळे त्यांना आपली मार्जिन ठेवून तेलाच्या दरात वाढ करावी लागते.