Petrol-Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त, एका SMS वर चेक करा नवे दर

Petrol-Diesel Price Today :  गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 25, 2023, 08:41 AM IST
Petrol-Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त, एका SMS वर चेक करा नवे दर  title=
Petrol diesel prices on 25 April 2023

Petrol-Diesel Price On 25 April 2023 : तुम्ही जर आज पेट्रोल (petrol rate) भरायला जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत घट झाली असून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel price) ही दर कमी झाले आहे. देशांतर्गत तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलचे दरात घट झाली आहे. परिणामी पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या...

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाला असून गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्या आहेत. यामध्ये ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $82.64 आणि WTI $78.69 झाली आहे. सध्या देशात तेलाच्या किमती न वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या शहरामध्ये दर स्थिर आहेत. दुसरीकडे चेन्नईमध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 9 पैशांनी महागून 102.73 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये तर डिझेल 89.96 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

शहर  पेट्रोल (प्रति लिटर रु.)  डिझेल (प्रति लिटर रु.)
मुंबई  106.31 94.27
दिल्ली 96.72 86.62
कोलकाता 106.03 92.76
चेन्नई 102.63 94.24
बेंगळुरू 101.94  87.89
पाटणा 108.12  94.86
गुरुग्राम 97.18 90.05
केरळ 117.17 103.93
जयपूर 108.73 95.03
लखनौ 96.68 95.03
तिरुवनंतपुरम  108.58 97.45
पोर्ट ब्लेअर 84.10  79.74
गुरुग्राम 97.10 89.96
भुवनेश्वर 103.19 94.76 
चंदीगड 96.20 84.26
हैदराबाद 109.66 97.82

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.