२०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' ने ट्विटरवर केला हा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण, केवळ मोदींची लोकप्रियताच नाही तर त्यांचे कार्यक्रम आणि योजनाही सोशल मीडियात यंदाच्या वर्षात चर्चेत राहील्या.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 28, 2017, 10:58 PM IST
२०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' ने ट्विटरवर केला हा रेकॉर्ड title=
File Photo

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण, केवळ मोदींची लोकप्रियताच नाही तर त्यांचे कार्यक्रम आणि योजनाही सोशल मीडियात यंदाच्या वर्षात चर्चेत राहील्या.

#MannKiBaat ट्रेंडमध्ये

भारतामध्ये २०१७ या वर्षात ट्विटरवर #MannKiBaat हा हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहीला. ट्विटरच्या मते, 'मन की बात' या कार्यक्रमासंदर्भात सर्वाधिक ट्विट करण्यात आले. यामध्ये दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचंही ट्विट आहे.
तर, #jallikattu हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर राहीला आणि #GST हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर राहीला.

मुंबई रेन्स आणि ट्रिपल तलाकही ट्विटरवर

'मन की बात' एक रेडिओ कार्यक्मर आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासीयांना संबोधित करतात. याचं थेट प्रसारण ऑल इंडिया रेडिओ, डीडी नॅशनल, डीडी न्यूजवर केलं जातं.

ट्विटरतर्फे सांगण्यात आलं की, 'मुंबईरेन्स आणि ट्रिपल तलाक यांचा सर्वाधिक वापरण्यात आलेल्या हॅशटॅग्समध्ये समावेश आहे. वर्षाच्या सुरुवातीला सर्वाधिक वापरण्यात आलेल्या हॅशटॅगमध्ये डिमॉनेटायजेशन, स्वच्छ भारत, उत्तर प्रदेश, गुजरात इलेक्शन आणि आधार यांचा समावेश आहे.

अनुष्का-विराटचं लग्नही चर्चेत

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांचं लग्नही सोशल मीडियात प्रचंड चर्चेचा विषय ठरलं. विराट कोहलीसोबत लग्न करण्यासंदर्भात अनुष्काने केलेलं ट्विट हे 'गोल्डन ट्विट ऑफ द ईयर' निवडण्यात आलं. 

ट्विटरकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, अनुष्काने लग्नाची घोषणा केलेल्या या ट्विटला सर्वाधिकवेळा रिट्विट करण्यात आलं. या ट्विटसोबत त्यांच्या लग्नाचाही फोटो होता.