मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान

मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला  तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

PTI | Updated: Nov 27, 2018, 11:07 PM IST
मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान  title=

नवी दिल्ली : मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी उद्या मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे.

मध्यप्रदेश आणि मिझोराम विधानसभांच्या सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात उद्या मतदान होत आहे. काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर गेले अनेक दिवस प्रचारात गुंतलेल्या नेतेमंडळींनी मोकळा श्वास घेतलाय. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. मात्र याचा तणाव न बाळगता त्यांनी आज कुटुंबियांसोबत मेजवानीचा आस्वाद लुटला.

दुसरीकडे मिझोराममध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणला लागलीये... ईशान्य भारतात भाजपानं एकेक करून सर्व राज्य ताब्यात घेतली आहेत. आता मिझोराममध्ये विजय मिळवून इशान्येमधून काँग्रेसचं पूर्ण उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. या प्रयत्नाला कितपत यश येतं, हे ११ तारखेला होणाऱ्या मतमोजणीत समजेल.