छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान

छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 

PTI | Updated: Nov 20, 2018, 08:00 PM IST
छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान  title=
Pic Courtesy : PTI

रांची : छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल. या टप्प्यात अनेक विद्यमान मंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विरोधीपक्ष नेते यांच्यासह भाजपाचे प्रमुख विरोधक अजित जोगी यांच्या पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत या टप्प्यातल्या ७२ जागांपैकी ४२ जागा भाजपानं जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या खात्यात २७ जागा आल्या होत्या. 

राज्यात मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सकाळी मतदानाचा उत्साह दिसून येत होता. वृद्ध मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मुख्यमंत्री रमण सिंग, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, राजनांदगाव खासदार अभिषेक सिंह, विधानसभा विरोधी पक्षनेते टी एस सिंग देव , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष भूपेश बघेल यांनी आपल्या क्षेत्रात मतदान केले. दुसऱ्या टप्प्यात १०७९ उमेदवार रिंगणात होते. त्यांचे भवितव्य आता ११ डिसेंबरला ठरणार आहे. 

मध्यप्रदेशात मतांचा जोगवा

तर दुसरीकडे मध्यप्रदेशात सध्या उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी  मतदारसंघातील मतदारांच्या भेटी घेतायतं. नागदा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार दिलीप शेखावत यांच्याबाबत एक धक्कादायक घटना घडली.. मतदरांच्या भेटी घेत असताना एका व्यक्तीने शेखावत यांना चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. शेखावतांच्या हे लक्षात येताचं क्षणाचाही विलंब न करता हा हार काढून फेकून दिला. 

 वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

इंदूरच्या रऊ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान काँग्रेस आमदार आणि उमेदवार जितू पटवारी यांचा समाजमाध्यमांवर वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये महिला मतदार पैसे घेऊन मतदान करतात असा आरोप केला. त्यावर उपस्थित महिलांचा संताप झाला. जितू पटवरींनीही आक्रमकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.. पण त्याचा होताना दिसत नाही. महिलांच्या आक्रमक पवित्रा बघून आता जितू पटवारीही सामोपचारानं घेण्याचा करतात खरे. पण महिलांचा रोषाला सामोरं जावं लागले.