ठिकाणांची'अश्लिल' नावे असल्याचा 'त्या' मंडळींना फायदा, पॉर्न वेबसाईटने दिली मोठी ऑफर

 सध्या समाजमाध्यमांमध्ये आणि इतरही माहितीच्या स्त्रोतांतून एक वृत्त व्हायरल होत आहे. यात अश्लिल आषयांसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाईट 'पॉर्न हब'ने आपल्या युजर्ससाठी एक अजब ऑफर जाहीर केल्याचे वृत्त आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 30, 2018, 09:29 PM IST
ठिकाणांची'अश्लिल' नावे असल्याचा 'त्या' मंडळींना फायदा, पॉर्न वेबसाईटने दिली मोठी ऑफर title=

नवी दिल्ली : झी २४ तास डॉट कॉम हे कोणत्याही प्रकारच्या अश्लिल कृती, चित्रफिती किंवा तत्सम माहिती अथवा कृत्याचे समर्थन करत नाही. मात्र, जगभरातला सर्वाधिक अवकाश व्यापून घेणाऱ्या समाजमाध्यमांतून (सोशल मीडिया) काही माहिती, वृत्त जेव्हा व्हायरल होते, तेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यम म्हणून त्याची दखल घ्यावी लागते. सध्या समाजमाध्यमांमध्ये आणि इतरही माहितीच्या स्त्रोतांतून एक वृत्त व्हायरल होत आहे. यात अश्लिल आषयांसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाईट 'पॉर्न हब'ने आपल्या युजर्ससाठी एक अजब ऑफर जाहीर केल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार, ही वेबसाईट युजर्सना 'फ्री प्रिमियम अॅक्सेस' देत आहे. मात्र, हा अॅक्सेस केवळ त्याच लोकांना असेल, जे लोक 'अश्लिल' नावांशी संबंधीत परिसरात राहतात. विशेष असे की, अश्लिल नावांच्या शहरांच्या यादीत भारतातीलही एका शहराचा समावेश असून, हे शहर तामिळनाडूत असल्याचे समजते.

प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, या वेबसाईटच्या यादीत जगभरातील काही निवडक शरहांचा समावेश आहे. ज्यात शहरांची नावे किंवा त्यांचे शॉर्टफॉर्म अश्लिल अर्थ दर्शवतात. यादीत सहभागी करण्यात आलेली नावे ही, शरीराचे प्रायव्हेट पार्ट, सेक्स टॉय, डबल मीनिंग दर्शवणारे शब्दांशी संबंधीत आहेत. महत्त्वाचे असे की, हे वृत्त पॉर्न हबच्या अधिकृत वेबसाईटवरही शेअर केल्याचे समजते. तसेच, या वृत्ताशी संबंधीत एक व्हिडिओही शेअर करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

पॉर्न हबने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण लोअर डिकर म्हणजेच, अशा ठिकाणी राहता का? ज्या ठिकाणाचे नाव तुम्ही जाहीरपणे सांगू शकत नाही. जर आपण अशा ठिकाणी राहात असाल तर, तुम्ही मुळीच संकोच बाळगू नका. कारण तुम्ही आमच्या 'प्रिमियम प्लेस'चा हिस्सा आहात. महत्त्वाचे असे की, तामिळनाडूतील एक शहरही या यादित सहभागी आहे. एका रिपोर्टनुसार, यात  कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, रशिया, इग्लंड आणि भारतासह २० शहरांची नावे निवडण्यात आली आहेत.