राहुल गांधी अद्याप 'डायपरमध्ये'च : सिद्धार्थ नाथ

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ भलतेच घसरले आहेत. 'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही' अशा शब्दात सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 10, 2017, 10:20 AM IST
राहुल गांधी अद्याप 'डायपरमध्ये'च : सिद्धार्थ नाथ title=

मुंबई : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ भलतेच घसरले आहेत. 'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही' अशा शब्दात सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

सिद्धार्थ नाथ यांनी राहुल गांधींनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रीया दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. आपल्या ट्विटमधून भाजपवर हल्ला चढवताना राहुल गांधींनी 'मोदीजी, जय शहांनी खपूच खाल्लं आहे. तुम्ही पहारेकरी होता की भागिदार? काही तरी बोला', असे म्हटले होते.

राहुल गांधी यांच्या टीकेमुळे भाजपच्या गोटात चांगलाच संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावरही भाजपच्या गोटातून टीका सुरू आहे. राहुल गांधीवर टीका करताना उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. 'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशी टीका नाथ यांनी केली आहे.

दरम्यान, तोंडावर आलेली गुजरात विधानसभेची निवडणूक आण आणि दोन वर्षांवर येऊन ठेपलेली लोकसभेची निवडणूक विचारात घेऊन भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या आक्रमक प्रचाराचा आवाका ध्यानात घेऊन कॉंग्रेसनेही सावध पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. सध्याचा काळ कॉंग्रेसससाठी खडतर असला तरी, नव्या उत्साहाने पक्षबांधणी करण्याच्या संधीचाही आहे. त्यामुळे कॉंग्रेस सध्या त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. विरोधकांच्या हेटाळणीचा आणि टीकेचा विषय ठरलेले राहुल गांधीही सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भाजपकडून होणारा टीकास्त्राचा मारा अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.