'भारतात फेसबूक-व्हॉट्सऍपवर भाजप-आरएसएसचं नियंत्रण', राहुल गांधींचा आरोप

भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सऍपवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे. 

Updated: Aug 16, 2020, 07:46 PM IST
'भारतात फेसबूक-व्हॉट्सऍपवर भाजप-आरएसएसचं नियंत्रण', राहुल गांधींचा आरोप title=

नवी दिल्ली : भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सऍपवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे. हा आरोप करताना राहुल गांधींनी वॉलस्ट्रीट जर्नलच्या एका वृत्ताचा दाखला दिला आहे. भाजप आरएसएस या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून मतदारांना प्रभावित केलं जातंय. अमेरिकन माध्यमांनी फेसबूकचं सत्य समोर आणलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

काय आहे वॉलस्ट्रीट जर्नलच्या बातमीमध्ये?

भारतातल्या फेसबूकच्या बड्या अधिकाऱ्याने भाजपशी जोडल्या गेलेल्या ४ व्यक्ती आणि संस्थाना भडकाऊ भाषणाबाबतचे नियम वापरण्याला विरोध केला. फेसबूकच्या अंतर्गत ही भाषणं भडकाऊ आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी असल्याचं समोर आलं, तरी यावर कारवाई करण्यात आली नाही, असं वृत्त वॉलस्ट्रीट जर्नलने दिलं आहे. 

भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली, तर कंपनीच्या व्यावसायिक वृद्धीला धोका तयार होईल. भारतामध्ये जगातले सर्वाधिक फेसबूक वापरकर्ते आहेत, असं फेसबूक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणाल्याचा दावा वॉलस्ट्रीट जर्नलने केला आहे.