हाफिजच्या सुटकेवरुन राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा

आज मुंबईवरील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Updated: Nov 26, 2017, 10:59 AM IST
हाफिजच्या सुटकेवरुन  राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा  title=

मुंबई : आज मुंबईवरील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

हाफीज सईद सुटला 

 मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या सुटकेमुळे भारतातलं राजकीय वातावरणही तापलंय. पाकिस्ताननने त्याची नजरकैदेतून सुटका करत असल्याचं जाहीर केलं आहे. 

 
राहुल गांधींचं ट्विट 

 
 हाफिजच्या सुटकेवरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. ट्रम्प यांच्याशी झालेली गळाभेट व्यर्थ गेली का असं ट्विट करत राहुल यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणांवर तोंडसुख घेतलंय.