रेल्वेत मोठी भर्ती, धावणार 2 स्पेशल ट्रेन

रेल्वे भर्तीसाठी खास ट्रेन

रेल्वेत मोठी भर्ती, धावणार 2 स्पेशल ट्रेन  title=

मुंबई : रेल्वेने भर्तीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. सहाय्यक लोको पायलट आणि टेक्निशिअन पदासाठी ही भर्ती घेण्यात येणार आहे. या भर्तीच्या परिक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दोन स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामध्ये 05552 इंदौर - दरभंगा परिक्षा स्पेशल आणि आनंद विहार - सहरसा दरम्यान स्पेशल ट्रेन सोडण्यात आली आहे. 

 इंदौर - दरभंगा ही स्पेशल ट्रेन मंगळवारी इंदौरहून रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. तर हीच ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दरभंगा पोहोचणार आहे. ही ट्रेन बरास्ता उज्जैन, संत हिरदाराम नगर, बीना, कटनी, सतना, अलाहाबाद, छिवक्की, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दिलदार नगर, बक्सर, आरा, दानापुर, पटना, बख्तियारपुर, मोकामा, बरौनी आणि समस्तीपुर येथे थांबेल

या ट्रेनमध्ये सामान्य कोच असणार आहेत. तर 05576 आनंद विहार टर्मिनल - सहरसा ही ट्रेन मंगळवारी रात्री 8.50 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन 23 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजून 10 वाजता सहरसा येथे पोहोचणार आहे. सोलह सामान्य श्रेणी ट्रेन मुरादाबाद, लखनऊ, गोरखपुर, बगहा, नरगटियागंज, बेतिया, सुगौली, मोतिहारी, मुजफ्फरपुर, समस्तीपुर, हसनपुर, खगडिया येथे थांबणार आहे.