रेल्वे तिकीट बुकिंग घोटाळ्याचे रॅकेट उद्ध्वस्त

रेल्वे तिकीटाच्या बुकिंगमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालय त्या दिशेने पाऊले उचलतेय. 

Updated: May 24, 2018, 12:51 PM IST
रेल्वे तिकीट बुकिंग घोटाळ्याचे रॅकेट उद्ध्वस्त  title=

मुंबई : रेल्वे तिकीटाच्या बुकिंगमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालय त्या दिशेने पाऊले उचलतेय. रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्य होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकारन नेहमी वेगवेगळे नियम घेऊन येतात मात्र त्यातूनही काहीतरी जुगाड करुन गैरव्यवहार केले जातात. रेल्वे बुकिंगमध्ये घोटाळे करणारे असेच एक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलेय. आमदार, खासदार, बड्या सनदी अधिकार्यांच्या नावाने बनावट कगदपत्रे बनवून रेल्वे तिकीट कंन्फर्म करणार्या एका सराईत ठकाला रेल्वे जिआरपीने अटक केली आहे. देवप्रताप चतुर्भुज सिंह असे या ठकाचे नाव असून तो घर बसल्या देशभरात कुठेही तिकीट कंन्फर्म करत असे.  

हा देवप्रताप कोणी मंत्री संत्री नसला तरी कुठल्याही भागातील तिकीट अगदी काही क्षणात कन्फर्म करून द्यायाचा. त्यासाठी तो खासदार आमदार आणि वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या नावाचा वापर अगदी सर्रास करायाचा. अधीकार्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी . बक्षी तसेच लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईच्या जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवप्रताप सिंग वेटिंग लिस्टवाल्या प्रवाशांना खोटी पत्रे वाचायचा आणि त्यांच्याकडून १२००-२४०० रुपये वसूल करत असे. 

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथेही अशाच एका रॅकेटचा खुलासा करण्यात आला होता. या रॅकेटमधील व्यक्तींनी अशी युक्ती केली होती की रेल्वे तिकीट बुकिंग करताना सर्व्हरचा वेळ बदलून वेळेआधीच तत्काळ तिकीटे बुक केली जात असत. तसेच रेल्वेच्या व्यस्त मार्गावरील तिकीटे A कुमार, B कुमार, C कुमार या नावाने आधीच बुक केली जात असत. त्यानंतर ही तिकीटे मोठ्या किंमतीने विकली जात.