एकेकाळी कचरा वेचणारे आज बनले चंडीगडचे महापौर

एकेकाळी कचऱ्यातून कागदं गोळा करणारे राजेश कालिया आज महापौर बनले.

Updated: Jan 21, 2019, 06:02 PM IST
एकेकाळी कचरा वेचणारे आज बनले चंडीगडचे महापौर title=

चंडीगड : एकेकाळी कचऱ्यातून कागदं गोळा करणारे राजेश कालिया आज चंडीगडचे 25 वे महापौर बनले आहेत. पण त्यांचा हा आतापर्यंतच प्रवास इतका सोपा देखील नव्हता. गरीब आणि अनुसूचित जातीसाठी संघर्ष करणारे राजेश कालिया यांना सुरुवातीला गरीबीचा सामना करावा लागला. त्यांचे वडील सफाई कामगार आणि आई देखील कचरा वेचण्याचं काम करत होते.  सात भाऊ-बहिनींचं पालन-पोषण करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. लहानपणी शाळा सुटल्यानंतर राजेश कालिया आपल्या भावंडांसोबत कचऱ्यात कागदं वेचायला जायचे. कचऱ्याच्या ढिगात मिळणाऱ्या वस्तू विकून त्यांचा उदरनिर्वाह होत होता.

सोनीपतच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या राजेश कालिया यांनी झी मिडियाशी बोलतांना म्हटलं की, त्यांनी कधी विचार देखील केला नव्हता की ते चंडीगडचे महापौर बनतील. राजनीतीमध्ये आवड असल्याने राजेश कालिया हळूहळू भाजपच्या संपर्कात आले. त्यानंतर पक्षात काम करायला लागले. भाजपने त्यांना महापौर देखील केलं. राजेश कालिया यांचं म्हणणं आहे की, आज मी जे पण आहे ते भाजपमुळे. भाजप एक असा पक्ष आहे जो चहा विकणाऱ्य़ाला पंतप्रधान आणि कचरा वेचणाऱ्याला महापौर बनवू शकतो.

डड्डूमाजराममध्ये राहणारे राजेश कालिया यांनी म्हटलं की, त्यांचे वडीस 1975 ला परिवारासोबत सोनीपत येथून चंडीगडला आले. त्यांचे वडील सफाई कामगार होते. पंजाब सरकारचे कर्मचारी असलेले त्यांचे वडील रिटायर्ड झाले आहेत. त्यांनी सगळ्यांना बारावी पर्यंत शिकवलं. राजेश कुमार कालिया भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात 1984 मध्ये जोडले गेले. रामजन्मभूमीच्या संघर्षात त्यांनी १५ दिवस तुरुंगात काढले.

राजेश कालिया हे भाजपच्या एससी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. मागील 30 वर्षापासून ते भाजप आणि आरएसएससोबत आहेत. 2011 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2016 मध्ये ते नगरसेवक झाले. त्यानंतर आज ते महापौर बनले आहेत.

राजेश कालिया यांचा हा राजकीय प्रवास मोठा होता. त्यांचं नाव वेगवेगळ्या वादांमध्ये देखील आलं. ज्यामुळे त्यांना घेरण्याचा विरोधकांना संधी मिळाली. महापौर झाल्यानंतर ही ते त्यांच्याच पक्षाच्या अनेक नगरसेवकांच्या विरोधात दिसले. अनेकांनी क्रॉस वोटिंग केली पण त्यांनी म्हटलं की, ते नेहमी पक्षासोबत उभे राहतील. राजेश कालिया यांनी 1996 मध्ये लव्हमॅरेज केलं. त्यांची पत्नी सामान्य घरातून आहे. राजेश कालिया यांनी 3 मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी देखील राजकारणात सक्रिय आहे.

चंडीगडच्या डड्डूमाजरामधील डंपिंग ग्राउंड हे तेथील स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. राजेश कालिया यांनी म्हटलं की, डंपिंग ग्राउंड हटवणं ही त्यांची प्राथमिकता आहे. त्यामुळे आता ते कशा प्रकारे काम करतात हे पाहावं लागेल.