असा असेल बलात्कारी गुरमीतचा जेलमधील दिनक्रम

आता पर्यंत डेरा सच्चा सौदा किंवा बाबा राम रहीम सिंह या नावाने ओळखला जाणारा हा बलात्कारी आता फक्त कैदी क्रमांक १९९७ या नावाने ओळखला जाणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 28, 2017, 07:49 PM IST
असा असेल बलात्कारी गुरमीतचा जेलमधील दिनक्रम  title=

चंदीगड : आता पर्यंत डेरा सच्चा सौदा किंवा बाबा राम रहीम सिंह या नावाने ओळखला जाणारा हा बलात्कारी आता फक्त कैदी क्रमांक १९९७ या नावाने ओळखला जाणार आहे. 

आतापर्यंत अगदी लक्झरी आयुष्य जगणाऱ्या या बाबाला १० नव्हे तर तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या कैद्याला आता जेलच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. अगदी सकाळी उठून इतर कैद्याप्रमाणे काम तर करावंच लागणार पण तेथील जेवण आणि झोपण्याची व्यवस्था ही देखील कैद्याप्रमाणेच असणार आहे. 

सुरूवातीच्या काळात गुरमीत राम रहीम कडून थोडी सामान्य काम करून घेचली जातील. मात्र त्यानंतर साफसफाईपासून ते अगदी बगीच्याची देखरेखीसारखी सगळी कामं करून घेतली जातील. आतापर्यंत अगदी सुखाचं आयुष्य जगणाऱ्या या

गुरमीतचा दिनक्रम कसा असेल जाणून घ्या? 

सकाळी ४.३० ला उठावे लागेल 
सकाळी ५ वाजता हाजिरीसाठी रांगेत उभं रहावं लागेल
सकाळी ५.३० वाजता चहा मिळेल आणि त्यानंतर व्यायाम करावा लागेल 
सकाळी ६.३० वाजता प्रार्थना केली जाईल आणि त्यामध्ये वाईट कामांपासून दूर राहण्यासाठी शपथ घेतली जाईल 
सकाळी ७.३० वाजता नाश्तासाठी रांगेत उभं रहावे लागेल 
सकाळी ८.३० वाजता कोर्टाने सांगितलेली काम करायला दिलेली पाहिजे 
सकाळी १०.३० वाजता काम करताना पुन्हा रांगेत उभं राहून हजेरी द्यावी लागेल 
सकाळी ११ वाजता पुन्हा कामाला सुरूवात करावी लागेल 
दुपारी १२ वाजता जेवणासाठी बरॅकमध्ये आणलं जाईल 
दुपारी १२. ३० वाजता आंघोळीसाठी रांगेत उभं रहावं लागेल 
दुपारी १.३० वाजता रांगेत उभं राहून कैद्यांसोबत जेवावं लागेल 
दुपारी २ वाजता जेवण करून आपलं ताट घासून ठेवावं लागेल आणि तीन वाजेपर्यंत आराम करायचा 
दुपारी ३.३० वाजता चहासाठी रांगेत उभं रहावं लागेल 
सायंकाळी ४ वाजता जेलमध्ये साफ-सफाई करून घेतली जाईल 
सायंकाळी ५ ते ६ कैद्यांसोबत हॉलमध्ये बसून भजन करावे लागेल 
सायंकाळी ७ वाजता बरॅकमध्ये पुन्हा आणलं जाईल 
रात्री ८ वाजता पुन्हा रांगेत उभं राहून रात्रीचं जेवणं करावं लागेल 
रात्री ९ वाजता बरॅकमध्ये झोपण्यासाठी जावं लागेल जिथे जमिनीवर फक्त चादर अंथरून झोपावं लागेल